शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेने वाशीत साकारली स्वप्नातील भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 02:25 IST

महापालिकेने वाशीतील होल्डिंग पाँडच्या पडलेल्या भिंतीची दुरुस्ती करून त्यावर आकर्षक चित्रे रेखाटली आहेत. स्मार्ट सिटीमधील नागरिकांची स्वप्ने व आधुनिक विचार चित्रातून दाखविण्यात आले आहेत.

नवी मुंबई : महापालिकेने वाशीतील होल्डिंग पाँडच्या पडलेल्या भिंतीची दुरुस्ती करून त्यावर आकर्षक चित्रे रेखाटली आहेत. स्मार्ट सिटीमधील नागरिकांची स्वप्ने व आधुनिक विचार चित्रातून दाखविण्यात आले आहेत. चित्रे पाहण्यासाठी व स्वत:चाही सेल्फी काढण्यासाठी तरुणाई या परिसरामध्ये गर्दी करू लागली आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महापालिकेने शहर सुशोभीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी कचरा उचलणे, कचºयाचे वर्गीकरण, सार्वजनिक प्रसाधानगृह या गोष्टींना प्राधान्य दिले जात होते; परंतु यावर्षी शहरातील मोकळ्या जागांचे सुशोभीकरण व इमारतींच्या भिंतींचीही रंगरंगोटी केली जात आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथम भिंतीही बोलू लागल्या आहेत. अभियानाचा भाग म्हणून वाशी प्रभाग ६४च्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी त्यांच्या निधीतून होल्डिंग पाँडच्या भिंतींची दुरुस्ती व सुशोभीकरण केले आहे. वाशी बसडेपोकडून सीशोरकडे जाणाºया रोडवर सेक्टर ८मध्ये हा होल्डिंग पाँड आहे. कचºयामुळे या परिसरामध्ये नेहमीच दुर्गंधी असायची. ही समस्या सोडविण्यासाठी भिंतींची दुरुस्ती करून त्यावर चित्रे रेखाटण्याचा निर्णय घेण्यात आला. चित्रांमध्ये नवी मुंबईकरांची स्वप्ने दिसावी, यासाठी ग्राफिटी डिझाइनचे प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे रेखाटली असून, ती नवी मुंबईमध्ये चर्चेचा विषय बनली आहेत. रोबोटचा हात, स्वप्न पाहणारे डोळे, ज्येष्ठ नागरिकांच्या माथ्यावर तिसरा डोळा दाखविण्यात आला असून तो आधुनिक विचारांचे प्रतिबिंब भासत आहे.नवी मुंबईकरांची स्वप्ने चित्रातून भिंतीवर रेखाटण्यात आली असून, ही बोलकी भिंत पाहण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेले नागरिक, महाविद्यालयीन मुले सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणाला पसंती देत आहेत. सोशल मीडियामधूनही भिंतींचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. नवी मुंबईच्या प्रत्येक नोडमध्ये अशाप्रकारे सुशोभीकरण केले जावे, अशी भूमिका व्यक्त केली जात आहे.