शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत अनधिकृत इमारतीसाठी नाल्यावर भराव; अधिकारी मोकाट, भूमाफिया झाले सैराट

By नारायण जाधव | Updated: November 18, 2023 19:12 IST

नवी मुंबई महापालिका परिसरात सध्या लोकप्रतिनिधींची राजवट नसल्याने प्रशासनाला हाताशी धरून भूमाफिया मोकाट झाले आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिसरात सध्या लोकप्रतिनिधींची राजवट नसल्याने प्रशासनाला हाताशी धरून भूमाफिया मोकाट झाले आहेत. दिवसेंदिवस घणसोली, तळवली, गोठिवली परिसरात दहा पंधरा दिवसांतच इमारती उभ्या राहत असून त्यांना वीज, पाणी जोडण्याही मिळत आहेत. अशाच प्रकारे घणसोलीतील सेक्टर २१ मध्ये एका भूमाफियाने अनधिकृत इमारत बांधण्यासाठी चक्क नैसर्गिक नाला बुजविण्याचे काम सुरू केले आहे. नैसर्गिक नालाच बुजविल्यास या परिसरात नाल्याचा वाहून जाणारे सांडपाणी तुंबून ते नजीकच्या निवासीवस्तीत शिरून मोठी हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

जर नैसर्गिक नाला, ओहोळ, पाण्याचा प्रवाह अडविणे हा गंभीर गुन्हा आहे. मात्र, दिवसाढवळ्या घणसोली-तळवली परिसरात असे प्रकार घडत असून नवी मुंबई महापालिकेसह सिडकोने याकडे सपलेश दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. या परिसरातील अनधिकृत बांधकामांना नवी मुंबई महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने असे प्रकार वाढत असल्याचा स्थानिकाचा आरोप आहे.

माजी लोकप्रतिनिधीच करतायेत मांडवलीनवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे घणसोली, तळवली आणि गोठीवली या तीन गावांच्या हद्दीत असून याकडे नवी मुंबई महापालिकेसह सिडकोने दुर्लक्ष केले आहे. तिन्ही गावांतील काही माजी लोकप्रतिनिधींच ही अनधिकृत बांधकामे कोणी तोडू नये, यासाठी नवी मुंबई महापालिकेसह सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत मांडवली करीत असल्याची चर्चा आहे.

तात्पुरती होते कारवाईमहापालिकेतील ठाकरे साहेब तर सिडकोतील संजयच्या दूरदृष्टीखाली अनधिकृत बांधकामांचा वे(णू)लू गगनावर गेला आहे. यामुळेच कोणी तक्रार केल्यास महापालिका आणि सिडकोचे अधिकारी तात्पुरते जेसीबीचे भिंतीना फटके मारून दिखाव्यापुरती कारवाई करीत असल्याने भूमाफियांचे चांगलेच फावले आहे.

एमआरटीपी नोटिसांबाबत संशयाचे धुकेसिडकोने पनवेलच्या नैना आणि खोपटा परिसरात एका बांधकामांवर केलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. येथील एका उद्योजकाने त्याच्यावर केलेली कारवाई, सिडकोने पाठविलेल्या नोटिसांबाबत माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागविली हाेती. त्यात सिडकोने नोटिसा पाठविल्या नसल्याचे उत्तर दिले आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ज्या अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा पाठविल्या, त्या खऱ्या की खोट्या, त्यांच्यावर पुढे काय कार्यवाही केली, की नोटिसींचे कागदी घोडे नाचविले, या प्रश्नांसह संशयाचे धुके अधिक गडद होत चालले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई