शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप मतदार याद्या १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार, २३ फेब्रुवारीपर्यंत सूचना हरकतीची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 02:40 IST

Navi Mumbai : महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे काम निवडणूक विभागाने सुरू केले आहे. १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे काम निवडणूक विभागाने सुरू केले आहे. १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्यांवर २३ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागविल्या जाणार आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण करून १२ मार्चला मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची उत्सुकता सर्वच शहरवासीयांना लागली आहे. २०२० मध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु मार्चपासून कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली व त्यामुळे निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. जवळपास एक वर्षानंतर पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीसाठी मतदार याद्या महत्त्वाच्या असल्यामुळे त्या कधी प्रसिद्ध होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक विभागाने १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १५ जानेवारी २०२१ पर्यंतच्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय याद्यांचे विभाजन करून त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्यांमध्ये काही त्रुटी असतील किंवा त्याविषयी नागरिकांचे काही आक्षेप असतील तर ते दूर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये नागरिकांनी  त्यांच्या हरकती सादर करणे अपेक्षित आहे. या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर ३ मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.   ८ मार्चला मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध केल्यानंतर १२ मार्चला मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.प्रभागाच्या यादीत करण्यात येणार दुरुस्त्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहायमतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे,नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूकआयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करतानालेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनहीप्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. याद्यांविषयी उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना मतदार याद्यांविषयी  उत्सुकता लागली आहे. मतदार  याद्यांमध्ये जास्त त्रुटी नसतील तर अर्धी लढाई जिंकल्यासारखे वाटत असते. याद्यांमध्ये त्रुटी असल्या तर त्या दुरुस्त करून घेणे, सूचना व हरकती दाखल करणे व त्रुटी सुधारून घ्याव्या लागत असतात. यामुळे आता सर्वांनाच याद्या अनुरूप येणार की नाही याविषयी उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईElectionनिवडणूक