शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर अखेर तयार, आराखडा एनएचआरसीएलला सादर

By नारायण जाधव | Updated: October 10, 2022 15:55 IST

दोन शहरांतील अंतर येणार तीन तासांवर

नवी मुंबई : अखेर बहुचर्चित ७११ किमीच्या मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर तयार झाला असून, तो एनएचआरसीएलला अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला सादर करण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या बुलेट ट्रेनच्या कामास रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार सुरुवात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेप्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विक्रबाद आणि हैदराबादसह या ११ रेल्वेस्थानकांचा समावेश असणार आहे. हा बुलेट ट्रेन मार्ग ठाणे जिल्ह्यातील ९ किमीचा असणार आहे. जिल्ह्यातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, उसरघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख.) या गावांची जमीन जाणार आहे.

मुंबई आणि हैदराबाददरम्यानचा प्रवास करण्यासाठी १४ तास लागतात; परंतु जर बुलेट ट्रेन सुरू झाली, तर मुंबई ते हैदराबाद प्रवास फक्त तीन तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे या मार्गास देशाच्या रेल्वे इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. कारण महाराष्ट्रासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या विकासात हा मार्ग मोलाचा ठरणार आहे.

विमानाद्वारे केले लिडार सर्वेक्षणगेल्या वर्षीच्या मे महिन्यात ‘मुंबई-पुणे-हैदराबाद’ बुलेट ट्रेनसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सुरुवात झाली होती. त्यासाठी सर्वेक्षणाकरिता अत्याधुनिक ‘एरियल लिडार’ आणि ‘इमेजरी सेन्सर’ने बसवलेल्या विमानाने पाहणी करून ग्राउंड सर्वेक्षण केले होते.

ग्रीन कॉरिडॉरमुळे होताेय विरोधया मार्गात ठाणे, पुणे, सोलापूर जिल्ह्यांच्या ग्रीन कॉरिडॉरमधील वन आणि शेतजमीन बाधित होणार आहे. यामुळे शेतकरी आणि पर्यावरणवाद्यांकडून त्यास आधीपासूनच विरोध होत आहे.

३५० किमीच्या वेगाने धावणार बुलेट ट्रेन७११ किमीच्या या मार्गावर प्रतितास ३५० किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावेल, असा त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा वेग सरासरी २५० किमी प्रतितास असेल. रूळ स्टॅंडर्ड गेजचे असणार असून, एका ट्रेनची प्रवासी क्षमता ७५० असणार आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईBullet Trainबुलेट ट्रेन