शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जेएनपीटी वसाहतीच्या घरभाड्यात दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:53 IST

इमारतींची दुरुस्तीही नाही : दरवाढ मागे घेण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी

मधुकर ठाकूर।लोकमत न्यूज नेटवर्कउरण : जेएनपीटी वसाहतीच्या गळक्या आणि नादुरुस्त निवासी इमारतींची दुरुस्ती न करताच प्रशासनाने रहिवासी व वाणिज्य वापर होणाऱ्या इमारतींच्या भाड्यात दुपटीने वाढ केली आहे.जेएनपीटी बंदराच्या उभारणीनंतर कामगार वसाहतीची निर्मिती केली आहे. ३३ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या कामगार वसाहतीमध्ये कामगार, अधिकारी यांच्यासाठी ए, बी, सी, डी कॅटेगरीप्रमाणे निवासी संकुले तयार केली आहेत. त्याशिवाय वसाहतीमध्ये वास्तव्यासाठी येणाºया कामगारांना सर्वच आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी संकुलही उभारण्यात आले आहे. बंदरातील कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या निवासी संकुलात ए, बी, सी, डी टाइपच्या इमारतींच्या फ्लॉटचे मासिक भाडे कॅटेगरीप्रमाणे आकारले जात होते. मात्र जेएनपीटी प्रशासनाने टेम्प या अधिकृत शासकीय संस्थेने नियमानुसार निवासी आणि व्यापारी भाड्यात दरवाढ करण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या शिपिंग मंत्रालयाला दिले होते. शिपिंग मंत्रालयाने टेम्पने निर्देश दिल्याप्रमाणे बंदरातील कामगार संकुल आणि वाणिज्य जागांच्या भाड्यात दरवाढ करण्याचे आदेश देशभरातील मेजर पोर्ट प्रशासनाला चार वर्षांपूर्वीच दिले होते. त्यानुसार जेएनपीटी प्रशासनानेही रहिवासी व वाणिज्य वापर होणाºया इमारतींच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भाडेवाढ दुपटीने वाढली आहे. याआधी ए टाइप इमारतीला रहिवाशांसाठी दरमहा ३,३६० रुपये असलेले घरभाडे वाढवून ६,२७० रुपये करण्यात आले आहे. बी टाइपचे भाडे ४,४४० वरून ७,५६० रुपये तर सी व डी ७,५६० रुपयांवरून थेट १४० रुपये प्रति चौरस मीटर म्हणजेच ११,५०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. वाणिज्य भुईभाडेही १३० रु पयांवरून १९४ रुपये प्रति चौरस मीटर असे वाढवण्यात आले आहे. नूतनीकरणाचे काम होईपर्यंत भाडेवाढीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने डॉ. राजेंद्र मढवी यांनी जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.शिपिंग मंत्रालयाला टेम्पने निर्देश दिल्याप्रमाणे बंदरातील कामगार संकुल आणि वाणिज्य जागांच्या भाड्यात दरवाढ करण्याचे आदेश देशभरातील मेजर पोर्ट प्रशासनाला चार वर्षांपूर्वीच दिले होते. त्यानुसार भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.- जयंत ढवळे, मुख्य प्रबंधक, जेएनपीटी