शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ इमारतींमध्ये घरे घेऊ नका!, सिडकोचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 09:30 IST

या पार्श्वभूमीवर सिडकोने पुन्हा एकदा जाहीर आवाहन केले असून, पूर्वी नोटीस बजावलेल्या जवळपास २००  बेकायदा बांधकामांची यादी जाहीर केली आहे. तसेच या बांधकाम प्रकल्पांमध्ये घरे विकत न घेण्याचे आवाहन केले आहे.

नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रातोरात उभ्या राहणाऱ्या अशा बेकायदा इमारतीत घरे घेणाऱ्यांची फसवणूक होत आहे. विशेष म्हणजे सिडकोकडून अशा बांधकामांना वेळोवेळी नोटीस बजावूनही बांधकामे पूर्ण करून त्यातील घरे विकली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोने पुन्हा एकदा जाहीर आवाहन केले असून, पूर्वी नोटीस बजावलेल्या जवळपास २००  बेकायदा बांधकामांची यादी जाहीर केली आहे. तसेच या बांधकाम प्रकल्पांमध्ये घरे विकत न घेण्याचे आवाहन केले आहे.

सिडको आणि संबंधित प्राधिकरणांच्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जटील बनला आहे. गावठाण क्षेत्रातील मोकळ्या जागा बळकावून त्यावर सर्रासपणे टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. त्यातील घरे तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असल्याने गरजूंची फसवणूक होत आहे. मागील काही वर्षांत अशापक्रारच्या अनधिकृत इमारतींचे लोण दक्षिण नवी मुंबईत पसरले आहे. विशेषत: खारघर, उलवे, तळाेजा, कोंबडभुजे, तरघर, कोपर, गणेशपुरी आणि उरण या परिसरात अशा बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे. 

या विभागात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांना सिडकोने १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत नोटीस बजावल्या होत्या. मात्र, त्यानंतरही यातील अनेक बांधकामे पूर्ण करण्यात आली असून, त्यातील घरे विक्रीसाठी सज्ज झाली आहेत. त्यामुळे स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या गरजूंची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडकोने या सर्व बांधकामांची त्यांना पूर्वी बजावलेल्या नोटीसच्या तपशिलासह वृत्तपत्रात यादी प्रसिद्ध केली असून, कोणीही या प्रकल्पांमध्ये घरे घेऊ नयेत, असे आवाहन केले आहे. 

एनएमएमसी क्षेत्रातील बांधकामांकडे दुर्लक्ष    सिडकोने दक्षिण नवी मुंबईतील जवळपास दोनशे बेकायदा बांधकामांची यादी जाहीर केली आहे. परंतु, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील फक्त एकाच बांधकामाचा यात समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आजही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत.     एकट्या ऐरोलीत आजमितीच शंभरपेक्षा अधिक बांधकामे सुरू आहेत. त्यापाठोपाठ गोठीवली, घणसोली, कोपरखैरणे, जुहूगाव, वाशीगाव, सानपाडा आदी ठिकाणी बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू आहे. विशेष म्हणजे बोनकोडे गावात शासकीय जमिनीवर टोलेजंग इमारतीचे काम सुरू आहे. त्याकडे महापालिकेसह सिडकोने सोयीस्कररित्या डोळेझाक केल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :cidcoसिडको