शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 07:11 IST

२०२६ च्या मध्यापर्यंत, विमान उड्डाणांची संख्या जवळपास तीनपटीने वाढवून दररोज ५५ उड्डाणे करण्याचे नियोजन आहे

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे औपचारिक उद्घाटन या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू होणार आहेत.

त्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया समूहाने विस्तार आराखडा जाहीर केला असून,  यानुसार एअर इंडिया एक्स्प्रेसमार्फत सुरुवातीला दररोज २० उड्डाणे सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे महामुंबईतील नागरिकांना नवी मुंबईतून देश-विदेशसाठी उड्डाण घेता येणार आहे. नंतरच्या टप्प्यात, म्हणजेच २०२६ च्या मध्यापर्यंत, विमान उड्डाणांची संख्या जवळपास तीनपटीने वाढवून दररोज ५५ उड्डाणे करण्याचे नियोजन आहे. त्यात पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. सन २०२६ च्या हिवाळ्यापर्यंत एकूण ६० दैनिक उड्डाणे सुरू करण्याचे उद्दिष्ट समूहाने समोर ठेवले आहे.

९ कोटी प्रवासी क्षमता

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची आणि ०.५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीची क्षमता निर्धारित केली गेली आहे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर हे विमानतळ तब्बल ९० दशलक्ष म्हणजेच ९ कोटी प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्यास सक्षम असेल.

भारताच्या स्वप्नांना गतीअदानी एअरपोर्ट्ससोबतची भागीदारी जागतिक हवाई केंद्र होण्याच्या स्वप्नांना गती देईल, असा विश्वास एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी व्यक्त केला.  अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनीही या भागीदारीचे स्वागत केले.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई