शहरं
Join us  
Trending Stories
1
५० खोके हे सत्यच, संतोष बांगरांना एकनाथ शिंदेंनी ५० कोटी दिले; भाजपा आमदाराचा खळबळनजक दावा
2
बिहार निवडणुकीतील घात कोणी केला? आरजेडीने चौकशी सुरू केली; कठोर कारवाई करण्याची तयारी
3
निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे!
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
इंजिनिअर जावई शोधला, लग्नात ६० लाखांचा खर्च; हुंड्यासाठी छळ, लेकीने ६ महिन्यांत आयुष्य संपवलं
6
दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ?
7
'या' EV कारवर भारतीय ग्राहक तुटून पडले; कंपनीने दर 10 मिनिटाला विकली एक इलेक्ट्रिक SUV
8
नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार...
9
वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो
10
"टेन्शनमुळे त्याच्या छातीत दुखायला लागलं...", पलाश मुच्छलच्या डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
11
मॅडम सर्जन निघाली मुजम्मिलची पत्नी; २८ लाख रुपये देऊन स्लीपर सेलला केली मदत, NIA चौकशीत धक्कादायक खुलासा
12
राक्षस नवरा! मधुचंद्राच्या रात्री नवरीने 'ती' मागणी नाकारली; संतापलेल्या नवरदेवाने हातोडा घेऊन केले जीवघेणे वार
13
बाबा वेंगाचे भाकित: २०२६ मध्ये भूकंप, ज्वालामुखी, प्रलयाने हादरणार जग; पृथ्वीचा एक भाग होणार बेचिराख
14
'माझ्यामुळेच जिंकलो असं कुणी समजू नये', अमित शाहांनी भाजप नेत्यांचे टोचले कान
15
'दिलेला शब्द पाळा, हीच जगाची ताकद...', डीके शिवकुमारांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश
16
'अमर' नव्हे 'अकरम'! हिंदू नाव सांगून मैत्री, नोकरीचे आमिष अन्...; नराधमाला १० वर्षांचा कठोर कारावास
17
Video - 'आयफोन' वाला लंच बॉक्स घेऊन शाळेत गेला मुलगा; शिक्षिकाही झाली हैराण
18
अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी
19
ज्यांचे बँक खाते किंवा UPI ID नाही त्यांनाही ऑनलाईन पेमेंट करता येणार! भीम ॲपचे नवीन फीचर' लाँच
20
गौतम गंभीरची कोच पदावरून हकालपट्टी होणार? लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIने आखला नवीन 'प्लॅन'
Daily Top 2Weekly Top 5

वाशी खाडीत आढळले डॉल्फिन्स, मच्छीमारांना दिसले दोन दिवसांपूर्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 06:53 IST

Dolphins : गेल्या दोन दिवसांपासून डॉल्फिनचे मनोहारी दृश्य सोशल मीडियाद्वारे पाहावयास मिळत असले तरी नवी मुंबईतील सारसोळे गावच्या मच्छीमारांना डॉल्फिनचे प्रत्यक्षात दर्शन घडल्याचे सांगण्यात येते.

नवी मुंबई : खोल समुद्रात मनसोक्त विहार करणाऱ्या डॉल्फिन माशांची जोडी वाशी खाडीत आढळल्याने लोकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून डॉल्फिनचे मनोहारी दृश्य सोशल मीडियाद्वारे पाहावयास मिळत असले तरी नवी मुंबईतील सारसोळे गावच्या मच्छीमारांना डॉल्फिनचे प्रत्यक्षात दर्शन घडल्याचे सांगण्यात येते.मुंबईमधील ट्राॅम्बे (माहूल) आणि नवी मुंबईतील  सारसोळे खाडीलगत डॉल्फिन जलविहार करताना नवी मुंबईतील सारसोळे कोळीवाड्यातील मच्छीमारांनी प्रत्यक्षात पाहिले. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यामुळे डॉल्फिन मासा हा सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला.खोल समुद्रात आढळणारा हा डॉल्फिन मासा भरकटल्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईच्या मध्यभागी असलेल्या खाडीत आला असावा. मुंबईतील एका मच्छीमाराने या डॉल्फिनचा व्हिडीओ व्हायरल केला असल्याचे नवी मुंबईतील काही मच्छीमारांनी सांगितले.  सारसोळे येथील मच्छीमार विकास कोळी, कैलास कोळी, देवा मेहेर आणि राजेश मेहेर यांना डॉल्फिनचे दर्शन घडले. रेवदंडा, मुरूड, आगरदांडा, दिघी या खाडी भागात पूर्वी डॉल्फिन मोठ्या प्रमाणात होते. मात्र कालांतराने समुद्रात वाढलेल्या रेती तसेच कंपनीच्या मालवाहतूक बोटींमुळे डॉल्फिनची संख्या कमी होत गेली.- महेश सुतार, मच्छीमार, वाशी गाव डॉल्फिन समुद्रात क्रीडा करताना दिसत असून खाडीचे पाणी शांत असताना मोठ्या प्रमाणात हे डॉल्फिन जलविहार करतात. अलिबागजवळील खंदेरी आणि उंदेरीच्या खोल समुद्रात अचानकपणे त्यांचे दर्शन होते.- मनोज मेहेर, मच्छीमार

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई