शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील जलसंपत्तीचे महत्त्व कळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 02:08 IST

जलसंपन्न महापालिका म्हणून नवी मुंबईची देशभर ओळख आहे. स्वत:च्या मालकीचे धरण, १३२ विहिरी, २४ तलाव, ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, रेल्वेचे धरण एवढा प्रचंड जलसाठा शहरात उपलब्ध आहे

नामदेव मोरे नवी मुंबई : जलसंपन्न महापालिका म्हणून नवी मुंबईची देशभर ओळख आहे. स्वत:च्या मालकीचे धरण, १३२ विहिरी, २४ तलाव, ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, रेल्वेचे धरण एवढा प्रचंड जलसाठा शहरात उपलब्ध आहे. परंतु मोरबे धरण वगळता इतर जलसाठ्याचा वापरच होत नाही. पाण्याची उधळपट्टी सुरू असून बांधकामासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर करणारे एकमेव शहर असून भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.देशातील सर्व प्रमुख महानगरांना तीव्र उकाड्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक शहरांमध्ये आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच पाणी मिळत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागत असून अनेक गावांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. परंतु नवी मुंबई हे एकमेव शहर असे आहे जिथे मे अखेरीसही चोवीस तास पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील बांधकामांसाठीही पिण्याचे पाणी वापरले जात आहे. अशाप्रकारे उधळपट्टी करणारे एकमेव शहर आहे. बहुतांश उद्याने व पिण्याव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींसाठी शुद्ध पाण्याचाच वापर केला जात आहे. वास्तविक नवी मुंबईमध्ये मोरबे धरणाव्यतिरिक्त प्रचंड जलसाठा उपलब्ध आहे. दिघा येथील रेल्वेच्या धरणामध्ये उन्हाळ्यातही भरपूर पाणी आहे. परंतु हे धरण हस्तांतर करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन वर्षापूर्वी हस्तांतरणासाठी आजी-माजी खासदारांमध्ये श्रेयवाद सुरू होता. प्रत्यक्षात पाण्याचा काहीही उपयोग झालेला नाही.महापालिका कार्यक्षेत्रामध्ये २४ तलाव असून त्यामधील पाण्याचा काहीही उपयोग केला जात नाही. याशिवाय शहरात १३२ विहिरी आहेत. विहिरींची स्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक विहिरी बुजविल्या जात आहेत. देशातील सर्वात चांगली मलनि:सारण केंद्रे नवी मुंबईमध्ये आहेत. सात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. परंतु येथील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा काहीही उपयोग होत नाही. वास्तविक शहरातील रेल्वेचे धरण, विहिरी व तलावांसह मलनि:सारण केंद्रामधील पाण्याचा वापर बांधकाम व्यवसाय, उद्यान व इतर वापरासाठी केला जावू शकतो. पण यासाठीची यंत्रणा उभी करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर वापर केला नाही तर भविष्यात इतर शहरांप्रमाणे नवी मुंबईकरांनाही पाणीसमस्येला सामोरे जावे लागू शकते.उद्यानांना पाणी वापरण्यास सुरुवातशहरातील मलनि:सारण केंद्रामधील प्रक्रिया केलेले पाणी काही उद्यानांना पुरविले जात आहे. परंतु पाण्याचा उपलब्ध साठा व होणारा वापर यामध्ये प्रचंड तफावत आहे. पाण्यावर प्रक्रिया करून ते खाडीत सोडून द्यावे लागत असून याविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.