शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाच दूध कंपन्यांवर वितरकांचा बहिष्कार!

By admin | Updated: April 28, 2015 02:04 IST

अपुऱ्या कमिशनचे कारण देत मुंबई महानगरातील दूध विक्रेत्यांनी अमूल, मदर डेअरी, गोकूळ, महानंद आणि वारणा या पाच नामांकित दूध कंपन्यांच्या पिशवीबंद दूध विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

चेतन ननावरे - मुंबईअपुऱ्या कमिशनचे कारण देत मुंबई महानगरातील दूध विक्रेत्यांनी अमूल, मदर डेअरी, गोकूळ, महानंद आणि वारणा या पाच नामांकित दूध कंपन्यांच्या पिशवीबंद दूध विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सध्यातरी सकाळी घरपोच होणाऱ्या वितरणासाठी काही प्रमाणात दूध खरेदी सुरू आहे. मात्र १ मेपर्यंत कमिशनवाढीच्या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही, तर पाचही कंपन्यांच्या संपूर्ण दूध विक्रीवर बहिष्कार टाकणार असल्याचे मुंबई दूध विक्रेता संघाचे जगदीश कट्टीमणी यांनी सांगितले.पुरेसे कमिशन मिळत नसल्याने दूध विक्रेते स्टॉल आणि दुकानांवर दूध थंड करण्यासाठी एमआरपीहून चढ्या किमतीने दुधाची विक्री करीत होते. मुंबईसह सर्वच शहरांत गेल्या काही वर्षांपासून अशाच प्रकारे दूध विक्री सुरू आहे. मात्र त्याची तक्रार कशी व कोणाकडे करायची, या प्रश्नाने हवालदिल ग्राहक निमूटपणे एमआरपीहून अधिक किमतीने दूध खरेदी करीत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून वैधमापनशास्त्र विभागाने एमआरपीहून चढ्या किमतीने दूध विक्री करणाऱ्या ३०० हून अधिक दुकानदारांवर खटले भरले. त्यांमध्ये दूधविक्रेत्यांसोबत दूध कंपन्यांनाही सामील करून घेण्यात आले आहे. योग्य कमिशन मिळत नसल्याने विक्रेत्यांना स्टॉल आणि दुकानांत वाढीव किमतीने दूध विक्री करावी लागत असल्याची कबुली कट्टीमणी यांनी दिली. ते म्हणाले की दूध विक्रेत्यांनी यापूर्वी विविध दूध कंपन्यांकडे कमिशनवाढीची मागणी केली आहे, मात्र त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एमआरपीहून अधिक किमतीने दूध विक्री करावी लागत आहे. मात्र प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईनंतर दूध कंपन्यांसोबत चर्चा केल्यानंतरही कोणताही तोडगा निघालेला नाही. परिणामी संघटनेने अपुरे कमिशन देणाऱ्या कंपन्यांच्या दूध खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.गाईच्या दुधामागे किती कमिशनकंपनीकमिशनटक्केअमूल१.२५३.२९मदर डेअरी१.२५३.२९गोकूळ१.४५३.८१महानंद१.५०३.९४वारणा२.५०६.२५म्हशीच्या दुधामागे मिळणारे कमिशनकंपनी किंमतकमिशनटक्केअमूल५०१.४५२.९०मदर डेअरी४८१.५०३.१२गोकूळ५०१.४५३.१२वारणा४८१.५०४.९०इतर नामांकित कंपन्यांकडून पुरेसे कमिशन मिळत असल्याने बहिष्कार टाकलेल्या कंपन्यांच्या दुधाला त्यांचा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. पर्यायी दुधामध्ये आरे, कृष्णा, नवनाथ, नरेन, गोविंद अशा दूध कंपन्यांना पसंती असल्याने त्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे.अमूल, मदर डेअरी, गोकूळ, महानंद या कंपन्यांच्या दुधाची प्रति लीटर एमआरपी किंमत ३८ रुपये, तर वारणाची प्रति लीटर किंमत ४० रुपये आहे. मात्र इतर कंपन्यांसोबत स्पर्धा करण्यासाठी वारणाही ३८ रुपये दराने विकावे लागते. त्यामुळे वारणाची विक्री करताना केवळ ५० पैसे कमिशन मिळते.गैरसोय नाहीपाच कंपन्यांच्या दूध विक्रीवर बहिष्कार टाकल्यानंतरही ग्राहकांची गैरसोय होणार नाही, असे आश्वासन अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघाने दिले आहे. इतर नामांकित दूध कंपन्यांच्या दुधाची विक्री करून ग्राहकांना दुधाचा पुरवठा केला जाणार आहे.