शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

एमआयडीसीविरोधात असंतोष

By admin | Updated: October 1, 2015 02:06 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघा परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघा परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु या कारवाईच्या विरोधात रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला. हजारोंच्या संख्येने रहिवासी रस्त्यावर उतरल्याने परिसरात सकाळपासूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही दुकानांच्या गाळ्यावर कारवाईची औपचारिकता करून एमआयडीसीच्या पथकाला माघारी फिरावे लागले. असे असले तरी सोमवारपासून पुन्हा कारवाई गतिमान करणार असल्याचे एमआयडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा यांच्या जनहित याचिकेची दखल घेत न्यायालयाने दिघा परिसरातील ९९ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यातील बहुतांशी इमारती एमआयडीसीच्या जमिनीवर आहेत. त्यामुळे एमआयडीसीने या बांधकामांना एमआरपी अ‍ॅक्टनुसार नोटिसा बजावून मंगळवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी बिंदूमाधव नगरमधील बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारतींवर कारवाई करण्यात आली. तर आज दिघा परिसरातील तीन निवासी इमारतींवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार सकाळपासूनच या विभागाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र या कारवाईच्या विरोधात हजारोंच्या संख्येने रहिवासी रस्त्यावर उतरल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आयुष्यभराची कमाई खर्ची घालून आम्ही या इमारतीत घरे घेतली. त्यावर आता कारवाई होणार असेल तर आम्ही जायचे कुठे, असा सवाल संतप्त महिलांनी उपस्थित केला. आम्हाला बेघर करण्यापेक्षा या इमारती बांधणारे विकासक, त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, महापालिकेचे अधिकारी, वीज पुरवठा देणारे महावितरणचे संबंधित अधिकारी व बघ्याची भूमिका घेणारे पोलीस यांच्यावर पहिल्यांदा कारवाई करा, अशी मागणी संतप्त रहिवाशांनी यावेळी लावून धरली. दरम्यान, रहिवाशांच्या विरोधामुळे सकाळी ९.३0 ते दुपारी २.३0 वाजेपर्यंत एमआयडीसीच्या पथकाला कोणतीही कारवाई करता आली नाही. शेवटी न्यायलयाच्या आदेशानुसार ही कारवाई अपरिहार्य असल्याचे एमआरडीसी व पोलीस अधिकाऱ्यांनी रहिवाशांना समजावून सांगितले. त्यामुळे दुपारनंतर त्यांचा विरोध काहीसा मावळल्याने तीन वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली. असे असले तरी आज केवळ इमारतीतील काही वाणिज्य गाळे व एका हॉटेलच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर तिन्ही इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)--------------------दिघ्यातील शिवराम सदन, पार्वती अपार्टमेंट व केरू प्लाझा या तीन अनधिकृत इमारतींवर आज कारवाई करण्यात येणार होती. त्यानुसार सकाळपासूनच या विभागाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. परंतु रहिवाशांनी या कारवाईच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. घोषणाबाजी करीत रहिवाशांनी कारवाईला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. काही महिलांनी मार्गात गणपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवला होता. विरोध करणाऱ्यांत महिलांची संख्या लक्षणीय होती. समाजसेविका ऋता आव्हाड यांनी आज पुन्हा रहिवाशांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.