शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

गर्दुल्ल्यांचे अड्डे बंद होत नसल्याने असंतोष; वाशीसह नेरूळमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 23:48 IST

पालिकेसह शैक्षणिकसंस्थांनीही दिले पोलिसांना पत्र; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

नामदेव मोरे नवी मुंबई : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईमधील उद्याने व मोकळ्या इमारतींसह खाडीकिनारी अमलीपदार्थ ओढणारांचे अड्डे तयार झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही व गर्दुल्ल्यांच्या त्रासामुळे रहिवासी त्रस्त झालेले असतानाही पोलिसांकडून कडक कारवाई केली जात नाही यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. वाशीमधील उद्यानांमधील अड्डा बंद करावा यासाठी महापालिकेसह शैक्षणिक संस्थांनीही पोलिसांना पत्र दिले आहे.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून अमलीपदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. अमलीपदार्थविरोधी पथकानेही आयुक्तालय क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकून अमलीपदार्थांचा साठा जप्त केला आहे. परंतु आयुक्तालय क्षेत्रामधील अमलीपदार्थांच्या विक्रीचे प्रमाण पाहता पोलिसांची कारवाई कमी पडू लागली आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरातील अनेक उद्याने, मोकळ्या इमारती, खाडीकिनारी असलेल्या मोकळ्या जागांवर गांजा, चरस व इतर अमलीपदार्थ ओढत बसलेल्या तरुणांचे प्रमाण वाढू लागले आहे. उद्यानांमध्ये रात्री उशिरापर्यंत गांजा सेवन सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाशी सेक्टर १० मधील जनरल अरुणकुमार वैद्य उद्यानामध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत अमलीपदार्र्थांचे सेवन करणारे तरुण बसलेले असतात. दिवसाही या तरुणांचा उद्यानांमध्ये वावर असतो. एक आठवड्यामध्ये गांजा ओढणारांची आपसात भांडणे होऊन दोन जण जखमी झाले होते. या राडेबाजीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याविषयी प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर पोलिसांनी काही दिवस येथील गस्त वाढविली. परंतु आता पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.

वाशी सेक्टर १० मधील उद्यानामधील व परिसरातील अमलीपदार्थ ओढणाऱ्या व विकणाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात बंदोबस्त वाढविण्यात यावा, अशी मागणी महापालिकेच्या वाशी विभाग अधिकाºयांनी पोलिसांकडे केली आहे. याविषयी पत्र वाशी पोलिसांना दिले आहे. याशिवाय येथील साईनाथ हिंदी हायस्कूल, सेंट मेरी स्कूल, वाशी यांनीही पोलिसांना पत्र दिले आहे. परिसरात अमलीपदार्थांची विक्री व सेवन करणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. वाशीप्रमाणे नेरूळ सेक्टर ६ सारसोळेमधील उद्यान व मैदानामध्येही अमलीपदार्थ ओढणारांचा मोठा अड्डा तयार झाला आहे. काही दिवसांपूर्वी अमलीपदार्थ ओढणाºयांनी रोडवरील गाडीची तोडफोड केली होती. नवरात्रीदरम्यान अमलीपदार्थ ओढणाºया एका तरुणाने येथील सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या छतावर घर केले असल्याचेही निदर्शनास आले होते. कार्यकर्त्यांनी त्याला तेथून हुसकावून लावले आहे. उद्यानामध्ये बसविलेल्या गजेबोमध्ये उशिरापर्यंत गांजा ओढत तरुण बसलेले असतात. हा प्रकार थांबविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावीकोपरखैरणे, सीवूड, नेरूळ, वाशी, दिघा, एपीएमसी परिसरामध्ये अनेक ठिकाणी उद्यानांमध्ये व मोकळ्या जागांमध्ये गांजा ओढणारे व विकणाºयांचे अड्डे तयार झाले आहेत. नेरूळमधील सारसोळे सेक्टर ६ मधील दत्तगुरू सोसायटीसमोरील उद्यानामध्ये गांजा ओढणाºयांचा मोठा अड्डा आहे. नागरिकांनी एक वर्षामध्ये ५० पेक्षा जास्त वेळा पोलीस नियंत्रण कक्षामध्ये फोन केला आहे. तक्रार केली की पोलीस गस्त घालण्यासाठी येतात. मात्र पुन्हा दुर्लक्ष करतात. येथे काही दिवसांपूर्वी कारचीही तोडफोड करण्यात आली. प्रसाधनगृहाच्या छतावर गर्दुल्ल्याने आश्रय घेतला होता. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतल्यास शहरातील सर्व अड्डे बंद करणे शक्य होऊ शकेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.