नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची शुक्रवारी जोरदार चर्चा रंगल्याने त्यांच्या समर्थकांत अस्वस्थता पसरल्याचे दिसून आले, तर त्यांच्या विरोधकांनी आनंद व्यक्त केला आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर सर्वपक्षीय नगरसेवक नाराज आहेत. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी सत्ताधारी व विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणला होता. मात्र भाजपाने या ठरावाच्या विरोधात मतदान केले होते. तरीही हा ठराव बहुमताने मंजूर करून तो अंतिम कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला स्थगिती देत मुंढे यांना अभय दिले होते. असे असले तरी त्यांची बदली अटळ मानली जात होती. दरम्यान, शुक्रवारी त्यांच्या बदलीचे वृत्त धडकल्याने शहरात जर तरच्या चर्चेला उधाण आले होते. (प्रतिनिधी)
आयुक्त मुंढेंच्या बदलीची चर्चा
By admin | Updated: December 24, 2016 03:28 IST