शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

माथाडी संघटनेमधील मतभेद उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:36 IST

बंदविषयी एकवाक्यता नाही; कडकडीत बंदची परंपरा पहिल्यांदा खंडित

नवी मुंबई : प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदनिमित्त माथाडी संघटनेमधील मतभेद पुन्हा उघडकीस आले आहेत. कामगार नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांच्यामध्ये बंदविषयी एकवाक्यता झाली नाही. परिणामी, बाजारसमितीच्या स्थापनेपासून प्रथमच कडकडीत बंदची परंपरा खंडित झाली असून आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.सद्यस्थितीमध्ये राज्यातील सर्वात मोठी कामगार संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची ओळख आहे. माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या या संघटनेची व्याप्ती राज्यभर पसरली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही याच संघटनेचे वर्चस्व आहे. ४३ वर्षांपासून कामगार संघटनेने आंदोलनाचे आवाहन केल्यानंतर बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळला जात होता; परंतु २६ फेब्रुवारीला पुकारण्यात आलेल्या बंदला प्रथमच संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. भाजी मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू होते. बंदचा फारसा परिणाम येथील व्यवहारांवर झालेला नाही. जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे मार्केट सुरू ठेवण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र माथाडी नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मार्केट सुरू राहिल्याची चर्चा दिवसभर बाजार समितीमध्ये सुरू होती. नरेंद्र पाटील हे संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मार्केट सुरू ठेवण्यासाठी काही घटक व इतर संघटना प्रयत्न करत होत्या. फळ मार्केटमध्येही इतर माथाडी संघटनांनीही मार्केट सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता; परंतु दुपारनंतर कामगार आक्रमक झाल्यामुळे जावक थांबविण्यात आली. कांदा, धान्य व मसाला मार्केटमध्ये बंद होते.माथाडी संघटनेमधील प्रमुख नेत्यांमध्ये अनेक वर्षांपासून काही विषयांवर मतभेद होत असल्याचे समोर येऊ लागले होते; परंतु कामगारांच्या हितासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये सर्व नेते आक्रमकपणे सहभागी होतानाचे चित्र दिसत होते; परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र पाटील यांना सातारा मतदारसंघामध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे प्रचारक होते. यामुळे प्रथमच प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय मतभेद झाले. बाजार समिती निवडणुकीमध्ये कामगार मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना बिनविरोध निवडून देण्यात आले. दोन्ही प्रमुख नेत्यांनी चर्चा करून हा निर्णय घेतल्यामुळे मतभेद मिटल्याची चर्चा सुरू झाली होती; परंतु आंदोलनाच्या निमित्ताने हे मतभेद पुन्हा समोर आले आहेत. यामुळे कामगारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे.संघटना एक राहावीमाथाडी कामगारांनीही नेत्यांच्या मतभेदाच्या चर्चेविषयी चिंता व्यक्त केली आहे. नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे हे दोन्हीही आक्रमक नेते असून कामगारांना त्यांची गरज आहे. माथाडी कायदा व कामगार दोन्हींच्या अस्तित्वासमोर अनेक संकटे निर्माण झाली आहेत. अशा स्थितीमध्ये दोन्ही नेत्यांनी एकविचाराने काम करावे, मतभेद वाढू देऊ नये, अशा प्रतिक्रिया अनेक कामगारांनी बंद दरम्यान व्यक्त केल्या.बंदसाठी पाटील आक्रमकमाथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी पुकारण्यात आलेला बंद यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील दिवसभर बाजार समिती परिसरात ठाण मांडून होते. प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन ते प्रत्येक मार्केटचा आढावा घेत होते. नाशिक, पुणे, सातारा व इतर ठिकाणी बंदची स्थिती काय आहे, याविषयी माहिती घेऊन कार्यकर्त्यांना सूचना देत होते.मतभेदाविषयी सावध प्रतिक्रियामाथाडी संघटनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा दिवसभर प्रसारमाध्यमे व बाजारसमितीमध्ये सुरू होती. याविषयी माहिती घेण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा मुद्दा महत्त्वाचा नाही. संपाची शासनाने दखल घेतली हे महत्त्वाचे असे सांगून मतभेदावर भाष्य करणे टाळले. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी मात्र मतभेदाच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. आम्ही एकत्रपणे कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू व शासनाकडून सर्व मागण्या मान्य करून घेऊ, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती