शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दिघा धरणाचे भिजते घोंगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 2:50 AM

ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्णपणे भरले आहे. वर्षभर भरपूर पाणी असूनही त्याचा वापर न होणारे दिघा हे देशातील एकमेव धरण आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्णपणे भरले आहे. वर्षभर भरपूर पाणी असूनही त्याचा वापर न होणारे दिघा हे देशातील एकमेव धरण आहे. ओसंडून वाहणाऱ्या धरणाच्या सुरक्षेकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असून, पर्यटक बुडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हाच्या रेल्वे इंजिनसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती. वर्षभर भरपूर पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ब्रिटिशांनी नवी मुंबईमधील दिघा इलठाणपाडा येथे १८.१० एकर जमिनीवर १८५ मीटर लांबीचे व १४.९५ मीटर उंचीचे धरण बांधले. नैसर्गिक जलस्रोत असल्यामुळे या धरणातील पाणी मे महिन्यातही आटत नाही; पण स्वातंत्र्यानंतर या धरणातील जलसाठ्याचा काहीच उपयोग करण्यात आलेला नाही. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये छोटी-मोठी १८२१ धरणे आहेत. धरणांमधील पाणीवाटप व वापरावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू असतात; पण पाण्याचा वापर न होणारे दिघा हे एकमेव धरण ठरले आहे. पावसाळा सुरू होताच राज्यात सर्वात अगोदर हेच धरण भरले आहे. सद्यस्थितीमध्ये संरक्षण कठड्यावरून पाणी वाहत आहे. पर्यटकांनी या परिसरामध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. रोज शेकडो पर्यटक या धरण परिसरामध्ये पावसाळी पर्यटनासाठी जात आहेत. रविवारी व सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. धरण परिसरामध्ये सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, यामुळे अनेक तरुण धरणाच्या भिंतीवरील प्रवाहावर उभे राहून सेल्फी घेताना व फोटोसेशन करतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. स्टंटबाजीमुळे धरण परिसरामध्ये अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.धरणाची मालकी रेल्वेची आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणाची भिंत फुटण्याची व धरण असुरक्षित झाल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरू लागले होते. रेल्वेच्या अभियंत्यांनी धरणाची पाहणी करून ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिटही केले असून, दगडाचे बांधकाम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा यापूर्वीच दिला आहे. रेल्वेचे अधिकारी नियमित धरणाची पाहणी करत असले, तरी तेथील सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. धरण परिसरामध्ये पर्यटकांचा गोंधळ सुरू असतो. पावसाळ्यात अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय धरणाच्या पायथ्याला झोपड्यांची संख्या वाढली आहे. पावसाचे पाणी वाढल्यास झोपड्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हे धरण महापालिकेकडे हस्तांतर करण्याची मागणी केली आहे; पण त्या विषयी ठोस कार्यवाही झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी पाणी वापरावरून आजी-माजी खासदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली होती; परंतु आता दोन्ही लोकप्रतिनिधींनीही या विषयावर मौन बाळगले आहे.श्रेयासाठी फुकटची धडपड : दोन वर्षांपूर्वी दिघा धरणाचे पाणी नवी मुंबई व ठाणे शहराला देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. नवी मुंबई महानगरपालिकेकडे धरण हस्तांतर करण्याची महापालिकेची योजना होती. पण विद्यमान खासदार राजन विचारे व माजी खासदार संजीव नाईक यांनी धरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी आम्हीच पाठपुरावा केल्याचा दावा करून श्रेय मिळविण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु सद्यस्थितीमध्ये धरणातील पाण्याचा काहीही उपयोग होत नसून दोन्ही लोकप्रतिनिधींनी मौन बाळगले आहे.पाणी असूनही घशाला कोरड : पाणी असूनही त्याचा वापर होत नसलेले दिघा हे राज्यातील व देशातील एकमेव धरण आहे. वर्षभर धरणातील पाणीसाठा पडून असतो. दुसरीकडे दिघा व ऐरोली परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात आठवड्यातून एक दिवस एमआयडीसी पाणीपुरवठा करत नाही. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो.स्टंटबाजपर्यटकांना रोखावेदिघा धरण परिसरामध्ये पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. उत्साही तरुण धरणाच्या भिंतीवरील प्रवाहामध्ये उभे राहून सेल्फी व सामूहिक फोटोसेशन करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भिंतीवरून खाली व धरणात पडून पर्यटकांचा मृत्यू होण्याची शक्यता निर्माण झाली असून, रेल्वेने या परिसरामध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. पोलिसांनीही गोंधळ घालणाºया पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पर्यटनाचीही संधीदिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर झाल्यास धरण परिसरातील जमिनीवर वनविभागाच्या मदतीने निसर्ग पर्यटन केंद्र उभारणे शक्य होणार आहे. महापालिकेकडून धरण हस्तांतरणासाठी काय कार्यवाही सुरू आहे याविषयी माहिती घेण्यासाठी मालमत्ता विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.