शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेताना हात थरथरत होते का; प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका 

By नामदेव मोरे | Updated: September 10, 2023 16:49 IST

मराठा आरक्षणावर स्वार होऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आखला जात आहे.

नवी मुंबई: मराठा आरक्षणावर स्वार होऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आखला जात आहे. आरक्षणाचे राजकारण केले जात आहे. जाणता राजा म्हणवणारे शरद पवार सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेण्यास त्यांचे हात थरथरत होते का अशी टिका आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये लाभार्थ्यांचा मेळावा आयोजीत केला होता. यावेळी प्रवीण दरेकर यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागीतला जात आहे. आरक्षणाच्या मुद्यावर स्वार होऊन सरकारला कोंडीत पकडण्याचे राजकारण केले जात आहे. राजकीय पोळी भाजून घेणारांपासून समाजाने सावध राहिले पाहिजे. स्वत:ला जाणता राजा म्हणवणारे शरद पवार आंदोलकांना भेटताना एक भुमीका घेतात व ओबीसी मेळाव्यात दुसरी भुमीका घेतात. यापुर्वी सत्तेत असताना व अनेक मराठा मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही. शरद पवार स्वत: राज्यात व केंद्रात सत्तेत होते. तेव्हा आरक्षणाचा प्रश्न सोडविताना त्यांचे हात थरथरत होते का अशा शब्दात त्यांनी टिका केली. मराठा समाजाला शिंदे, फडणवीस व अजीत पवार सरकारच आरक्षण देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ओबीसींसाठी असणाऱ्या सर्व योजना मराठा समाजासाठीही लागू केल्या जाणार आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६७२८९ नागरिकांना स्वत:च्या व्यवसाय उभारण्यासाठी ५ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या कर्जावरील ५१३ कोटी रूपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील मुलांना स्पर्धा परिक्षांसाठी सहकार्य केले असे सांगितले. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना व आता उपमुख्यमंत्री म्हणून महामंडळासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला. समाजाचे प्रश्न सोडविले असून त्यांच्यामागे ठाम उभे राहिले पाहिजे असे स्पष्ट केले. यावेळी महामंडळाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय उभारणाऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. कार्यक्रमास सुरज बर्गे, अंकुश लांडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबई ठाणेत ५ हजार उद्योजक घडविणारअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील मराठा बांधवांसाठी मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. प्रवीण दरेकर यांनी एमएमआर विभागातून ५ हजार उद्योजक घडविण्याचा संकल्प केला. मुंबई मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून यासाठी ५०० कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpravin darekarप्रवीण दरेकरSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षण