शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोने १९ हजार घरांचा प्रकल्प गुंडाळला? घरे विकली जात नसल्याने प्रशासनाचा घेतला निर्णय

By कमलाकर कांबळे | Updated: March 18, 2025 11:33 IST

ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी नावडे नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी प्रस्तावित केलेली  १८,८२० टू बीएचके घरांची योजना गुंडाळण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

नवी मुंबई : सिडकोची घरे विक्रीविना पडून आहेत. गेल्या सात वर्षांत बांधलेल्या २५ हजार घरांपैकी जवळपास सात हजार घरांना ग्राहक मिळताना दिसत नाही.  अलीकडेच जाहीर केलेल्या २६ हजार घरांनासुद्धा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी सिडकोची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अडकून पडली आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी नावडे नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी प्रस्तावित केलेली  १८,८२० टू बीएचके घरांची योजना गुंडाळण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी घरांची निर्मिती करणाऱ्या सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी  मध्यमवर्गीयांनाही दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत नावडे नोडमध्ये खास मध्यमवर्गीयांसाठी दोन खोल्यांची अर्थात टू बीएचकेच्या घरांची स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार केला. या नियोजित  वसाहतीत १८ हजार ८२० घरे प्रस्तावित होती. 

मागील काही वर्षांत सिडकोने बजेटमधील घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली आहे; परंतु विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात घरे विक्रीविना पडून आहेत. सिडकोच्या या धोरणामुळे मध्यमवर्गीय ग्राहक उपेक्षित राहिला आहे. त्यांच्या गृहस्वप्नांना खिंडार पडले आहे. या पार्श्वभूमीवर नावडे नोडमध्ये टूबीएचके घरांची स्वतंत्र टाऊनशिप उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. विशेष म्हणजे २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली होती.

आर्थिक पेच निर्माणविशेष म्हणजे या प्रस्तावाला संचालक मंडळाची मान्यताही मिळाली होती; मात्र मागील आठ वर्षांत विविध नोडमध्ये विविध घटकांसाठी बांधलेली घरेच विकली जात नसल्याने सिडकोसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर  नावडेमध्ये मध्यम आणि उच्च वर्गीयांसाठी नियोजित केलेला घरांचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती सिडकोतील सूत्राने दिली.

टॅग्स :cidcoसिडको लॉटरीNavi Mumbaiनवी मुंबई