शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर; पनवेलमधील रुग्णांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 23:51 IST

अतिदक्षता विभागही सुरू होणार

वैभव गायकरपनवेल : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच डायलिसिस व आयसीसीयू सेंटर सुरू होणार आहे. अत्याधुनिक दर्जाची सुविधा असलेल्या या सेंटरमुळे पनवेलमधील डायलिसिससाठी खासगी दवाखान्यात फेऱ्या मारणाºया रु ग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उपजिल्हा रु ग्णालयाच्या दुसºया माळ्यावर हे अत्याधुनिक सेंटर उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये ६ खाटांचे आयसीयू व ८ खाटांच्या डायलेसिस सेंटरचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मोजक्याच उपजिल्हा रु ग्णालयांपैकी ही अत्याधुनिक यंत्रणा पनवेल उपजिल्हा रु ग्णालयात सुरू होणार आहे. अशा प्रकारचे सेंटर हे नामांकित खासगी रु ग्णालयांतच पाहावयास मिळतात. सध्याच्या घडीला या सेंटरच्या विविध मशीनरी बसविण्याचे काम सुरू आहे. या सेंटरमध्ये मेडिकल गॅस पाइपलाइन, इम्पोर्टेड फ्लोरिंग्स, एअर हँडलिंग युनिट, डायलिसिस मशीन, व्हेंटिलेटर रूम, आयसोलेशन रूम आदींचा समावेश आहे. सध्याच्या घडीला डायलिसिसच्या रु ग्णांची संख्या वाढली आहे. अशा रु ग्णांसाठी ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. प्रत्येकी चार तासांनी एक डायलिसिस होणार असून आठ खाटांवर प्रत्येकी चार तासांनी विविध डायलिसिस रुग्णांना या ठिकाणच्या डायलिसिस सेंटरचा लाभ होणार आहे. खासगी रु ग्णालयात डायलिसिस करताना मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात. त्यातच मोजक्याच सेंटरमध्ये ही अत्याधुनिक डायलिसिस यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे अशा रु ग्णालयात डायलिसिस करताना खर्चाचा बोजा रु ग्णांच्या नातेवाइकांवर पडतो. त्यामुळे पनवेल उपजिल्हा रु ग्णालयातील या सेंटरमुळे गरीब व गरजूंना या सेंटरचा मोठा उपयोग होणार आहे.

अत्याधुनिक आयसीयू सेंटरदेखील या ठिकाणी कार्यान्वित होणार असून अत्यावश्यक वेळेला संबंधित रु ग्णांवर या ठिकाणी उपचार चालणार आहे. याकरिता ६ खाटांचे हे आयसीयू सेंटर आहे. व्हेंटिलेटरची व्यवस्था या ठिकाणी असल्याने नेहमीप्रमाणे अत्यावश्यक वेळेला रु ग्णांना इतर रु ग्णालयात हलवावे लागणार नाही.संबंधित सेंटरचे काम सुरू आहे. पुढील एक ते दीड महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर संबंधित यंत्रणा कार्यान्वित होऊन नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. - डॉ. नागनाथ यमपल्ले (अधीक्षक, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रु ग्णालय)रिक्त पदे भरण्याची मागणीविधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या रुग्णालयाचे घाईघाईत लोकार्पण करण्यात आले. आजही रुग्णालयात सर्जन व फिजिशियनची पदे भरली गेली नाहीत. ही पदे भरण्याची मागणीदेखील वेळोवेळी शासनाकडे लोकप्रतिनिधी, विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल