शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

गौरी-गणपतीला भक्तिभावाने निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:32 IST

नवी मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा गजरात गुरुवारी गौरी-गणपतीला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. दीड तसेच पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर सातव्या दिवशी गौरी-गणपती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रीतीने संपन्न झाला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरातील विसर्जन तलावांवर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बाप्पाची मनोभावे सेवा करून, ...

नवी मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा गजरात गुरुवारी गौरी-गणपतीला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. दीड तसेच पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर सातव्या दिवशी गौरी-गणपती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रीतीने संपन्न झाला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरातील विसर्जन तलावांवर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बाप्पाची मनोभावे सेवा करून, तसेच माहेरवाशीण गौराईचे लाड पुरवून भावपूर्ण निरोप देण्यात आला.नवी मुंबई परिसरातील २३ विसर्जनस्थळांवर सुमारे ११ हजार श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. घरगुती गणरायाबरोबरच सार्वजनिक मंडळांतील बाप्पाला या वेळी निरोप देण्यात आला. शहरात ठिकठिकाणी वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. दिघा तलावापासून ते सीबीडीपर्यंत असणाºया तलावांमध्ये श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले, तर वाशी येथील सागर विहार, ऐरोली जेटी, दिवाळे गाव, सानपाडा जेटी, बामणगवळी घाट, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, नेरुळ, रबाळे आदी तलावांमध्ये श्री गणरायाचे विर्सजन करण्यात आले. दिवा गाव, सानपाडा गाव, करावे गाव, दिवाळे गाव येथील आगरी-कोळी बांधवांनी गौरीचे विधिवत पूजन केले आणि गणरायासह तिचे विसर्जन केले.विसर्जन स्थळांवर सुरक्षा मार्गदर्शक त्याचबरोबर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते, तर अग्निशमन दलाचे पथक, आरोग्य व्यवस्था, विद्युत विभाग रात्री उशिरापर्यंत कार्यरत होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रभाग कार्यालयांतील अधिकारी वर्गाबरोबरच नवी मुंबई पोलिसांचा खडा पाहारादेखील विर्सजन घाटावर पाहावयास मिळाला. रात्री उशिरापर्यंत तलावांवर भाविक उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने तलावांवर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तलाव परिसरात निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत.विसर्जन स्थळांवर पोलीस तैनात असून भाविकांच्या सुरक्षेकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात आले. शहरातील मुख्य १४ तलावांमध्ये इटालियन गॅबियन वॉल पद्धतीच्या रचनेद्वारे निर्माण केलेल्या विशिष्ट जागेत भाविक भक्तांनी व मंडळांनी श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महापालिकेस अनमोल सहकार्य दिले. सर्व विसर्जनस्थळांवर श्रीमूर्ती विसर्जनाकरिता तराफ्यांची व आवश्यक त्या ठिकाणी फोर्क लिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काठावर बांबूचे बॅरेकेटिंगही करण्यात आले होते.भाविकांना पिण्यासाठी पाणी, तसेच वैद्यकीय पथकाचीही सोय या ठिकाणी करण्यात आली होती. महापालिकेसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या वतीने विसर्जन मार्गावरील गणेशभक्तांसाठी पाणपोई व प्रसादवाटप करण्यात आले.कृत्रिम तलाव नसल्याने नाराजीविसर्जनासाठी तलावामध्ये स्वतंत्र बांध बांधण्यात आला आहे. या ठिकाणी मूर्तींचे विसर्जन केले जाते. विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव नसल्याने पर्यावरणप्रेमी तसेच गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली.1पनवेल शहरातील तसेच तालुक्यातील सात दिवसांच्या बाप्पांना गुरुवारी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ घोषणा देत भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पनवेल महापालिकेतर्फे शहरातील तलावांवर विसर्जनस्थळांवर विशेष सोय करण्यात आली होती. त्यानुसार विसर्जनदरम्यान सुमारे पाच हजारांहून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. 2संपूर्ण पनवेल परिसरात वाजतगाजत श्रींच्या मिरवणुका निघाल्या होत्या. पनवेल शहरातील श्री बल्लाळेश्वर तलाव, वडघर खाडी, तक्का गाढी नदी, गावदेवी तलाव, शिरढोण, काळुंद्रे नदी, बंदर रोड आदी ठिकाणांसह उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात साधारण पाच हजारांच्यावर घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यात आले.नवीन पनवेल सेक्टर-८मधील तलावात, खांदेश्वर शिव मंदिराजवळील तलाव, सुकापूरजवळील गाढी नदीचे पात्र, खारघर सेक्टर-१५मधील कोपरा तलावात या वेळी शहरातील गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.विसर्जन स्थळावर जनजागृतीओले व सुके निर्माल्य वेगवेगळे ठेवले जावे, याकरिता दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून, नागरिकांनी ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात टाकावे, असे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, प्रसादाच्या फळांसाठी वेगळ्या कॅरेटची व्यवस्था करण्यात आली असून, हे प्रसाद साहित्य व फळे गरजू नागरिकांना वितरित करण्यात येत असल्याने नागरिकांनी सेवाभावी वृत्तीने यामध्ये सहभाग घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले. जमा निर्माल्यांची वाहतूक स्वतंत्र वाहनाद्वारे करण्यात येत असून निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रि या करण्यासाठी प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव