शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आवास बँकेच्या कर्जातून महामुंबईची विकासकामे, राज्यातील महानगरांतही पायाभूत सुविधा 

By नारायण जाधव | Updated: January 16, 2024 07:46 IST

या कर्जातून राज्यातील सर्व शहरांत पायाभूत सुविधा  निर्माण करण्यात येणार आहेत. 

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांसांठी महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय आवास बँकेकडून १,०३७ कोटी ४८ लाखांचे कर्ज घेणार आहे. या कर्जातून राज्यातील सर्व शहरांत पायाभूत सुविधा  निर्माण करण्यात येणार आहेत. 

यानुसार कोणत्या महानगरांत कोणत्या पायाभूत सुविधांची गरज आहे, याचा निर्णय मात्र राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील  समिती घेणार आहे. यामुळे नवी मुंबईसह राज्यातील २८ पालिकांसह नगरपालिकांच्या छोट्या शहरांत पायाभूत सुविधा निर्माण करणे सोपे होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ अर्थसंकल्पात ग्रामीण पायाभूत विकास निधीच्या (आरआयडीएफ) धर्तीवर शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता नागरी पायाभूत विकास निधी राष्ट्रीय आवास बँकेमार्फत उभारण्यात येईल, अशी घोषणा केली हाेती. 

‘या’ अटींची पूर्तता करावी लागणार या योजनेंतर्गत संबधित विभागाने शहरांत निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी आधी आपल्या अर्थसंकल्पात तरतूद करायची आहे. त्या तरतुदीतून पायाभूत सुविधांसाठी खर्च केल्यानंतर त्याची प्रतिपूर्ती राष्ट्रीय आवास बँक नंतर करणार आहे. मात्र, केंद्र  शासन व राष्ट्रीय आवास बँकेने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसारच या नागरी पायाभूत सुविध निर्माण करण्याची अट घातली आहे.

 राष्ट्रीय आवास बँकेच्या संचालकांनी महाराष्ट्र शासनाला राज्यातील विविध शहरांतील पायाभूत सुविधांसाठी १,०३७ कोटी ४८ लाखांपर्यंतचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने विविध शहरांतील पायाभूत सुविधांचे  प्रस्ताव तयार करून नियोजन विभागाची मान्यता घेऊन ते मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडे पाठवायचे आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबई