शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पर्यटनस्थळांचा विकास कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 22:44 IST

गवळीदेवलाही समस्यांचा विळखा, अडवली-भुतावलीचा प्रस्तावही बारगळला

- नामदेव मोरे

नवी मुंबई : स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या नवी मुंबईमधील पर्यटनस्थळांचा विकास रखडला आहे. गवळीदेव धबधबा परिसरालाही समस्यांचा विळखा पडला आहे. अडवली - भुतावली निसर्ग पर्यटनस्थळाचा प्रस्तावही बारगळला असून प्रशासनाच्या उदासीनतेविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून गवळीदेव धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणेसह रायगड जिल्ह्यामधील पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून गवळीदेवची ओळख आहे. पनवेलमधील कुंडी धबधब्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

अपघातामुळे पांडवकडा धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. परंतु गवळीदेववर आतापर्यंत पर्यटकांचा मृत्यू झालेला नाही. यामुळे येथे सहकुटुंब पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. पर्यटकांची संख्या वाढली, परंतु त्या प्रमाणात सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. येथील दोन्ही ठिकाणच्या प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. त्याची साफसफाई करण्यासाठी काहीही सोय नाही. धबधबा परिसरामध्ये जाण्यासाठी पायरी मार्ग तयार करण्यात आलेला नाही. रेलिंग बसविण्यात आले नाही. सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. पर्यटकांची सर्वाधिक गर्दी या ठिकाणी होत असते. पण अद्याप त्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेला नाही. क वर्ग पर्यटनस्थळामध्ये याचा समावेश व्हावा अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करू लागले आहेत. दिघामधील रेल्वे धरण परिसरामध्येही निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार होते. धरण व बाजूच्या डोंगरावर पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे प्रस्तावित होेते. याविषयी घोषणा झाली प्रत्यक्ष काहीच कार्यवाही झालेली नाही.

महापालिकेने यापूर्वी अडवली - भुतावली परिसरामध्ये निसर्ग पर्यटनकेंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. ६४४ हेक्टर जमिनीवर हे उद्यान विकसित केले जाणार होते.पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावानवी मुंबईमधील एकाही ठिकाणास पर्यटनस्थळाचा दर्जा नाही. गवळीदेवला क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळेल व गैरसोयी दूर होतील अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे.

गवळीदेव धबधबा हा ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील सर्वात सुरक्षित धबधबा आहे. नवी मुंबईला निसर्गाचे लाभलेले वरदान असून येथे येणाºया पर्यटकांसाठी काहीही सुविधा नाहीत. येथील प्रसाधनगृहाचीही दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने येथील गैरसोयी दूर केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल.- सचिन पवार, पर्यटक

मोरबेचा प्रकल्पही बारगळलामहापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण आहे. याठिकाणी १०० एकरपेक्षा जास्त भूभागाचा काहीही वापर होत नाही. येथे पर्यटनस्थळ विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठीचा एक प्रस्तावही सर्वसाधारण सभेत आणला होता, परंतु तो विषय बारगळला आहे.अर्थसंकल्पात फक्त तरतूदनवी मुंबईमधील गवळीदेव, अडवली भूतावली निसर्ग पर्यटनस्थळ, खाडीकिनाºयावर कृत्रिम चौपाटी विकसित करणे, मोरबे धरण परिसरात पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी प्रत्येक वर्षी तरतूद केली जात आहे. पण प्रत्यक्षात काहीही खर्च केला जात नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई