शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

द्राेणागिरीचा विकास सीआरझेडच्या कचाट्यात, सिडकोच्या २३ विकासकामांचा समावेश

By नारायण जाधव | Updated: November 7, 2022 20:47 IST

१६० व्या बैठकीत मागितला खुलासा

नवी मुंबई : सिडकोने सद्या उलवे, द्राेणागिरीतील विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र या नोडमध्ये कांदळवन क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून विकासकामांना मर्यादा आहेत. सिडकोने द्राेणागिरी नोडमधील ५० मीटर बफर झोनमधील विविध २३ विकासकामांसाठी सीआरझेडची परवानगी मागितली होती. त्यावर सीआरझेड प्राधिकरणाने सिडकोकडून खुलासा मागितला आहे. ही सर्व कामे सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहेत.संपूर्ण नवी मुंबई शहर हे ठाणे खाडीमुळे सीआरझेडच्या परिघात मोडते. यामुळे या शहरात कोणतेही विकासकामे करताना नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका असो वा सिडको महामंडळ अथवा एमएमआरडीए या प्रत्येकाला ही कामे विकासकामे करण्यासाठी महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाची अर्थात सीआरझेडची मान्यता घ्यावी लागते. अशाच प्रकारे सिडकोने द्राेणागिरी नोडमधील ५० मीटर बफर झोनमधील विविध २३ विकासकामांसाठी सीआरझेडची परवानगी मागितली होती.

या विकासकामांमध्ये तीन कामे सीव्हरेज ट्रिटमेंट प्लान्ट, पंप हाऊसची आहेत. तर, सेक्टर-५१,५२ आणि ५५,५६ मधील होल्डिंग पाॅडवरील पूल, २२ मीटरचा नाला बांधणे, आठ नाल्यांची सफाई, आठ सेवा रस्त्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे.

या प्रश्नांची उत्तरे द्या...सीआरझेडच्या १६० व्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव चर्चेसाठी आला असता प्राधिकरणाने सिडकोकडून ठोस खुलासा व स्पष्टीकरण मागितले आहे. यात प्राधिकरणाने म्हटले आहे, सिडकोने ही कामे आधीच पूर्ण केली आहेत काय. की सिडको नव्याने परवानगी मागत आहे, की कार्योत्तर मंजुरी मागत आहे. सीआरझेड प्राधिकरणाच्या या प्रश्नांना उत्तरे आता सिडकोला द्यावी लाणगार आहेत.

पावणे दोन लाख चौरस मीटर खारफुटी बाधितसीव्हरेज ट्रिटमेंट प्रकल्पसेक्टर ५६ व ५९ मध्ये ६१६९८ चौरस मीटर क्षेत्रात १०८ एमएलडी क्षमतेचा सीव्हरेज ट्रिटमेंट बांधण्यात येणार असून त्यात खारफुटी जाणार आहे. हा परिसर सीआरझेड १ ए मध्ये मोडतो. तर सेक्टर ५१ ए मध्ये ५९१५ चौरस मीटर जागेवर पंप हाऊस बांधण्यात येत असून यात ही खारफुटी बाधित होणार आहे.

सेवा रस्त्यांचे बांधकामविविध रस्त्यांसाठी सेक्टर १५ मध्ये ४३२२ चौरस मीटर, १५ ए मध्ये ७३३४ चौरस मीटर, सेक्टर ४१ मध्ये २३९१ चौरस मीटर, चौरस मीटर, सेक्टर ४८ मध्ये ५८९६ चौरस मीटर, सेक्टर ५० मध्ये २९८४ चौरस मीटर, सेक्टर ५६ मध्ये १५४५०चौरस मीटर, सेक्टर १५ मधील एसटीपी शेजारी २८६९ चौरस मीटर, सेक्टर २७ मध्ये सीआरझेड क्षेत्र बाधीत होत आहे.

नाल्यांची स्वच्छतासिडकोने सेक्टर ४७ ते ५५ मध्ये नाल्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला असून यात मोठ्याप्रमाणात खारफुटी बाधित होणार आहे.

बफर झोनहे क्षेत्र सीआरझेडच्या ५० मीटर बफर झोनमध्ये मोडते. यात सेक्टर ४७ मध्ये १०४८८ चौरस मीटर, सेक्टर ४८ मध्ये ४५१७ चौरस मीटर, सेक्टर ५० मध्ये ८३७६ चौरस मीटर, सेक्टर ५१ मध्ये १२०९६ चौरस मीटर, सेक्टर ५२ मध्ये आणि सेक्टर ५३ मध्ये प्रत्येकी ७७८९ चौरस मीटर तर सेक्टर ५४ आणि ५५ मध्ये प्रत्येकी ८२९० चौरस मीटर असे एक लाख ७० हजार ६३१ चौरस मीटर खारफुटी क्षेत्र बाधित होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई