शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विकासकांना प्रतीक्षा ग्राहकांची; घर खरेदीवर आकर्षक सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 02:44 IST

नोटाबंदी, जीएसटी आणि मोकळ्या भूखंडांच्या वाढलेल्या किमती पाहता बजेटमधील घरांच्या निर्मितीला खीळ बसली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची परवड सुरू आहे. असे असले तरी विकासकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्याचा संकल्प केला आहे.

नवी मुंबई : नोटाबंदी, जीएसटी आणि मोकळ्या भूखंडांच्या वाढलेल्या किमती पाहता बजेटमधील घरांच्या निर्मितीला खीळ बसली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची परवड सुरू आहे. असे असले तरी विकासकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार उपलब्ध असलेल्या सदनिका विक्रीसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. काही विकासकांनी गुढीपाडव्याला घराची नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक गिफ्ट देऊ केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २0१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेऊन या क्षेत्रातील अनिर्बंध व बेहिशोबी व्यवहाराला चाप लावला आहे. त्यानंतर लगेच जीएसटी व महारेरा कायदा कार्यान्वित केल्याने मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प पडले आहेत. मालमत्ता विकल्या न गेल्याने बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा मुहूर्त काही प्रमाणात का होईना तारून नेईल, असा विश्वास विकासकांना वाटतो आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. काहींनी तर घरखरेदीवर चक्क डिस्काऊंट देऊ केले आहेत, तर अनेकांनी आपल्या नवीन गृहप्रकल्पातील घरखरेदीवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत.रेडीरेकनरमध्ये वाढ न करण्याची मागणीनियमानुसार १ एप्रिलपासून रेडीरेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरांच्या किमती आणखी भडकणार आहेत. त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्राची सध्याची परिस्थिती लक्षात घेवून यावर्षी रेडीरेकनरच्या दरात वाढ करू नये, अशी मागणी क्रेडाई-एमसीएचआयने राज्य सरकारकडे केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी विकासकाच्या विनंतीवरून राज्य सरकारने रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ केली नव्हती. परंतु यावेळी ही वाढ अटळ मानली जात आहे. त्यामुळे घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बजेटमधील घरांसाठी आजही मोठी मागणी आहे. परंतु भूखंड उपलब्ध नसल्याने स्वस्त घरांच्या निर्मितीला खो बसला आहे. सध्याच्या स्थितीत नैना क्षेत्रातच बजेटमधील घरे निर्मितीला वाव आहे. परंतु सिडकोच्या उदासीन धोरणामुळे ही प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांवर या गुढीपाडव्यालाही निराशा पत्करावी लागणार, हे निश्चित आहे.- प्रकाश बाविस्कर,अध्यक्ष, क्रेडाई-एमसीएचआय, नवी मुंबई

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई