शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’चा तपशील आता मोबाइल अ‍ॅपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:39 IST

प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन : बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार

नवी मुंबई : नैना क्षेत्रातील जमिनीचा तपशील, नकाशे, विकास आराखडा आदींची इत्थंभूत माहिती सहजसोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनने नैना मोबाइल अ‍ॅप विकसित केला आहे. या अ‍ॅपचे गुरुवारी सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नैना बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर व इतर मान्यवर उपस्थित होते.

नैनाच्या विस्तीर्ण क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडको महामंडळाची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सिडकोने नैनाच्या विकासाला सुरुवात केली आहे. नगरपरियोजना अर्थात टीपी स्कीमच्या माध्यमातून या क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. असे असले तरी या क्षेत्रातील शेतकरी, भूधारक, जमीनमालक, विकासक, वास्तुविशारद आदीना विविध प्रश्नांची सांगड घालावी लागत आहे. या सर्व घटकांचा हा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनने मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. नैना मोबाइल अ‍ॅप या नावाने विकसित केलेल्या या अ‍ॅपचे गुरुवारी सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या दालनात उद्घाटन करण्यात आले. नैना मोबाइल अ‍ॅपची उपयुक्तता अधोरेखित करताना प्रशांत ठाकूर यांनी असोसिएशनच्या कामाचे कौतुक केले. या अ‍ॅपमुळे सिडकोचे काम काही प्रमाणात हलके व सुलभ होईल, असा विश्वास प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.

नैना बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी आपल्या छोटेखानी मनोगतानून नैना मोबाइल अ‍ॅपची गरज व त्याच्या उपयुक्ततेविषयी माहिती दिली. बांधकाम क्षेत्रासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरेल, असा विश्वासही बाविस्कर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सिडकोचे नवनियुक्त सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे यांनीसुद्धा या अ‍ॅपचे कौतुक केले. याप्रसंगी असोसिएशनचे सेक्रेटरी अ‍ॅड. संतोष पाटील, खजिनदार दिलीप वढावकर, महाराष्ट्रीय बिल्डर्स असोसिएशनचे मधू पाटील, विकास भांब्रे, एसीएचआय नवी मुंबई युनिटचे रवींद्र देशपांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :cidcoसिडको