शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सुकापूरमध्ये डेंग्यूचा रुग्ण दगावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 01:18 IST

सुकापूर येथे राहणाऱ्या रिंकू कुमार (१९) या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून रिंकू आजारी होता.

- वैभव गायकरपनवेल : सुकापूर येथे राहणाऱ्या रिंकू कुमार (१९) या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून रिंकू आजारी होता. नवीन पनवेलमधील एका खासगी क्लिनिकमध्ये तो उपचार घेत होता. मात्र, प्रकृती खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.पनवेल महानगरात याआधी डेंग्यूमुळे दोन रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. यात कामोठे व कळंबोलीतील रुग्णांचा समावेश होता. पनवेल महापालिका क्षेत्रात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढली असून, सध्याच्या घडीला ५४ च्या घरात ही संख्या पोहोचली आहे.पंचायत समिती क्षेत्रातही डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांची संख्या मोठी आहे. डेंग्यूच्या अळ्या या स्वच्छ पाण्यात आढळत असल्याने नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज असल्याचे मत पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी व्यक्त केले आहे. सुकापूर येथे डेंग्यूचा रुग्ण दगावल्यानंतर संबंधित रुग्णाची माहिती नेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली असल्याचे जाधव यांनी सांगितले.जिल्हा मलेरिया अधिकाऱ्यांच्या टीमसह पालिकेचे पथक सर्व्हे करत आहे. स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळत असल्याने नागरिकांनी आपल्या घरातील फुलदाण्या, भांडी, फ्रिज, भरलेल्या पिंपातील पाणी नियमित बदलणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी सांगितले. पालिकेमार्फ त जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यूच्या आजारावर उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांनाही डेंग्यूच्या रुग्णांची माहिती देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचे पालिकेच्या मार्फ त सांगण्यात आले.पालिका क्षेत्रात खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजे, पनवेल शहर, नवीन पनवेल आदी नोडचा समावेश आहे. हे क्षेत्र वगळल्यास करंजाडे तसेच पंचायत समितीचा मोठा भाग पनवेल तालुक्यात मोडतो. या विभागातही डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातला आहे. यासंदर्भात नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे.महापालिका क्षेत्रात १५ डेंग्यूचे रुग्ण, तर ५४ संशयितपनवेल महानगरपालिका क्षेत्रात यापर्वी दोन डेंग्यूचे रुग्ण दगावल्याची घटना घडली आहे. यामध्ये कामोठे व कळंबोली येथील रुग्णांचा समावेश होता. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात १५ डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आहे, तर संशयित रुग्णाची संख्या ५४ च्या घरात पोहोचली आहे.डेंग्यूबाबत केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता आपली काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे. डेंग्यूचा अळ्या स्वच्छ पाण्यात निर्माण होत असल्याने फुलदाण्या, टायर, चायनीज बांबू यामध्ये जास्त वेळ पाणी साचून राहणार नाही. याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.- डॉ. अरुणकुमार भगत,नगरसेवक, माजी सभापती आरोग्य समिती, पनवेल महानगरपालिकामलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजारांच्या निवारणासाठी जनजागृती करीत आहोत. सोसायट्यांमध्ये पोस्टर, घरोघरी सूचना देण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे, नागरिकांनीही डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराची लागण होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी.- डॉ. सचिन जाधव,आरोग्य अधिकारी,पनवेल महापालिका

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य