शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेवरच फाटका, अपमान प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 18:04 IST

उरण तालुक्यातील करंजा खाडीत शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाची मत्स्य प्रबोधिनी ( क्रमांक आयएनडी एमएच३ एमएम -४२६६ ) ही गस्तीनौका  कार्यरत आहे.

मधुकर ठाकूर

उरण : फाटका,मळका अथवा जीर्ण झालेल्या राष्ट्रध्वज लावणे हा कायद्याने गुन्हा असतानाही राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासकीय गस्तीनौकेवरच फाटका राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे.याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी कोकण विभागीय फिशरमेन कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी मुख्यमंत्री, रायगड पालकमंत्री, मत्स्यव्यवसाय मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीव्दारे केली आहे.

  उरण तालुक्यातील करंजा खाडीत शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाची मत्स्य प्रबोधिनी ( क्रमांक आयएनडी एमएच३ एमएम -४२६६ ) ही गस्तीनौका  कार्यरत आहे. खासगी भाडेतत्त्वावर घेतलेल्या या गस्तीनौकेवरच  फाटका, मळका राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे.२७ ते २८ एप्रिल दरम्यान शासनाने आयोजित केलेल्या सागरी सुरक्षा कवच या अभियानांतर्गतही ही गस्तीनौका समुद्रात गस्त घालण्यासाठी सहभागी झाली होती.

मात्र फाटका,मळका अथवा जीर्ण झालेल्या राष्ट्रध्वज लावणे हा कायद्याने गुन्हा असतानाही राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने या गस्तीनौकेचा वापर करून राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. याप्रकरणी संबंधितांशी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी कोकण विभागीय फिशरमेन कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी राज्याचे मुख्यमंत्री, रायगड पालकमंत्री, मत्स्यव्यवसाय मंत्री, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीव्दारे केली आहे.