शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतील एमजीएम हॉस्पिटलवर सायबर हल्ला, बिट कॉइनच्या स्वरूपात खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 08:29 IST

वाशीतील एमजीएम रुग्णालयातल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे.

नवी मुंबई : वाशीतील एमजीएम रुग्णालयातल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. हॅकर्सने तिथली संगणकीय यंत्रणा ठप्प करून बिट कॉइन स्वरूपात खंडणीची मागणी केली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागील काही दिवसांपासून शहरात सायबर हल्ल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. रविवारी रात्री अचानकपणे वाशीतील एमजीएम रुग्णालयातील संगणक प्रणाली ठप्प होऊ लागली. काही वेळातच हा सायबर हल्ला असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आले. अज्ञात व्यक्तीने तिथली संपूर्ण संगणकीय यंत्रणा ठप्प करून सायबर हल्ला झाल्याचे संदेश संगणकावर दिले, तसेच या हल्ल्यातून सुटकेसाठी खंडणीचीही मागणी केली. याकरिता त्याने स्वत:चा ईमेल आयडीही दिलेला आहे, त्यानुसार रुग्णालयाच्या वतीने गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार देण्यात आलेली आहे.

त्यानुसार वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा सायबर हल्ला रुग्णालयाच्या संगणकीय प्रणालीच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे झाल्याची शक्यता गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांनी वर्तवली आहे, तर हॅकरने खंडणीच्या रकमेचा उल्लेख केलेला नसून केवळ बिट कॉइन स्वरूपात खंडणीची मागणी केलेली आहे, त्याकरिता संपर्कासाठी दिलेल्या ईमेल आयडीच्या आधारे हॅकरचा शोध सुरू असल्याचेही दोशी यांनी सांगितले.

संगणक प्रणाली हॅक करण्याचे प्रकार सुरूचगेल्या वर्षी शहरात झालेल्या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यात जेएनपीटीच्या एका बंदरातील संपूर्ण संगणकीय यंत्रणा काही दिवसांकरिता ठप्प झाली होती. संबंधिताने आभासी चलनाच्या स्वरूपात खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळच हॅक झाल्याचा प्रकार घडला होता. यामुळे आॅनलाइन संगणकीय प्रणालीवर आधारित उद्योग व्यावसायिकांपुढे आधुनिक गुन्हेगारी पद्धतीचे संकट निर्माण झाले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी खारघरच्या एका हॉटेलवरील सायबर हल्ल्यानंतरचा दुसरा सायबर हल्ला वाशीतील रुग्णालयावर झाला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र