शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरे हटवा, पानटपऱ्या वाचवा मोहीम

By admin | Updated: January 26, 2017 03:37 IST

सिडको व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गरजेपोटी बांधलेल्या घरांपासून धार्मिक स्थळांपर्यंत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे

नामदेव मोरे / नवी मुंबईसिडको व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गरजेपोटी बांधलेल्या घरांपासून धार्मिक स्थळांपर्यंत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. मंदिरांवर कारवाई करणारी पालिका बार व इतर हॉटेलबाहेरील अनधिकृत पानटपऱ्या वाचविण्यासाठी धडपडत आहे. शहरात अनधिकृत टपऱ्या भाड्याने देण्याचा व्यवसाय तेजीत असून ५ ते २५ हजार रुपये मासिक भाडे आकारले जात आहे. या अर्थकारणामुळेच आरोग्याला घातक पान, विडी व अवैध गुटखा विक्री करणाऱ्या या टपऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अवैध बांधकामांवर कारवाई केली जात असून या मोहिमांसाठी प्रसिद्धी मिळविण्यासाठी प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. पालिकेच्या धडक मोहिमा सुरू असून किती ठिकाणी कारवाई केली याचा आढावाही वेळोवेळी प्रसिद्ध केला जात आहे. पण प्रशासनाकडून करण्यात येणारा दावा व शहरातील वास्तव यामध्ये फरक आढळू लागला आहे. अतिक्रमणावर कारवाई करताना पक्षपातीपणा केला जात आहे. समाजाला घातक ठरणाऱ्या व अवैध व्यवसाय करणाऱ्यांची बांधकामे पाडली जात नाहीत व त्यांचे साहित्यही जप्त केले जात नाही. यामध्येच पानटपऱ्यांचाही समावेश आहे. प्रत्येक हॉटेलच्या बाहेर अतिक्रमण करून पानविडी विक्रीचा स्टॉल सुरू करण्यात आलेला आहे. यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. पूर्णपणे अनधिकृत असलेल्या या टपऱ्या हटविल्या जात नाहीत. यामध्ये मोठे अर्थकारण दडलेले आहे. अनेक महत्त्वाच्या हॉटेलच्या बाहेरील पानटपऱ्यांचे भाडे महिन्याला २५ हजार रुपयांपर्यंत आहे. यामध्ये वाशी सेक्टर १७, नेरूळ, एपीएमसी व इतर ठिकाणच्या हॉटेलचा समावेश आहे. छोट्या हॉटेलच्या बाहेरील स्टॉललाही किमान पाच हजार रुपये भाडे आकारले जात आहे. अनधिकृत पानटपऱ्या या शहरवासीयांच्या आरोग्यालाही घातक आहेत. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई असली तरी हॉटेलच्या बाहेर बिनधास्तपणे धूम्रपान सुरू असते. गुटखा बंदी असतानाही दुप्पट ते पाचपट दराने गुटख्याची विक्री केली जात आहे. शहरातील अनेक पानटपऱ्यांवर गांजा व इतर अवैध गोष्टींचा व्यवसाय होत असल्याचे यापूर्वीच पोलिसांनी केलेल्या कारवाईमधून निदर्शनास आले आहे. तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करण्यास मनाई आहे. पण नवी मुंबईतील ९५ टक्के पानटपऱ्यांवर विडी, सिगारेट व इतर कंपन्यांच्या जाहिरातीचे स्टिकर लावण्यात आले आहेत. अनेक पानटपऱ्यांवर नामफलक सिगारेट कंपन्यांनी बनवून दिले आहेत. त्यासाठी टपरीचालकांना ५ ते १० हजार रुपये भाडेही दिले जात आहे. शहरातील मंदिर, झोपडी, फेरीवाले यांच्यावर कारवाई होत असताना अनधिकृत टपऱ्यांना अभय का व कोणाचे, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.