शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने घेतली सिडको अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:33 IST

खारघरमधील पूरपरिस्थिती : तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी; रखडलेल्या कामाविषयी नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघर शहरातील पांडवकडा धबधब्याचे पाणी वाहून नेणारा मुख्य नाला कोपरा या ठिकाणी फुटल्याने शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. या नाल्याचे पाणी सायन-पनवेल महामार्गावर आले होते. सुमारे तीन तास येथील वाहतुकीवर या घटनेचा परिणाम झाल्याने अनेकांना याचा फटका बसला. या घटनेला सिडकोचे ढिसाळ नियोजन जबाबदार असल्याने मंगळवारी खारघर शहरातील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सिडकोच्या मुख्य अभियंत्याची भेट घेतली.

खारघर शहरातील जो नाला फुटला, त्या नाल्याच्या प्रवाह बदलाचे काम मागील वर्षाभरापासून रखडले आहे. याकरिता सिडकोने नव्याने पूल व नाल्याचा प्रवाहाचे काम हाती घेतले आहे. मात्र, या ठिकाणाहून जाणारी नवी मुंबई महानगरपालिकेची जलवाहिनी व काही पेट्रोलियम कंपन्यांच्या वाहिन्या भूमिगत करण्याची गरज आहे. सिडको प्रशासन व अन्य प्राधिकरणाच्या समन्वयाच्या अभावामुळे या वाहिन्या भूमिगत होऊ शकल्या नाहीत. मात्र, या उदासीन कारभाराचा मोठा फटका खारघरवासीयांना भेडसावू शकतो, हे सोमवारच्या घटनेने सिद्ध झाले आहे. या संदर्भात जाब विचारण्यासाठी खारघर शहरातील भाजपच्या नगरसेवकांनी सिडकोचे मुख्य अभियंता के. के. वरखेडकर यांची सिडको भवनात भेट घेतली. या बैठकीत मुख्य नाल्याचे प्रवाह बदलण्याचे, रखडलेल्या कामाची माहिती मुख्य अभियंत्यांकडून घेण्यात आली. या वेळी वरखेडकर यांनी संबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या ठिकाणी सतत एक टीम कार्यरत राहणार असल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली. तसेच रखडलेले काम लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत शहराला भेडसावणारा दहा एमएलडी पाण्याचा तुटवडा, शहरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजण्याची मागणी करण्यात आली. सर्व कामे त्वरित हाती घेण्यात येतील, असेही या वेळी वरखेडकरांनी स्पष्ट केले. नगरसेवकांच्या शिष्टमंडळात प्रभाग ‘अ’ सभापती शत्रुघ्न काकडे, महिला बाल कल्याण सभापती लीना गरड, ज्येष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील, नगरसेविका आरती नवघरे, बीना गोगरी आदीसह सिडकोचे विविध विभागातील अभियंते उपस्थित होते.