शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

वन विभागाकडे २०११ हेक्टर खारफुटी जंगल हस्तांतरित करण्यास प्राधिकरणांकडून विलंब!

By नारायण जाधव | Updated: April 23, 2024 15:02 IST

कोकणाच्या सात जिल्ह्यांत नव्याने सर्वेक्षण सुरू : मॅन्ग्रोव्ह सेलने दिले निर्देश

नवी मुंबई : महाराष्ट्र मॅन्ग्रोव्ह सेलने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (MRSAC) ला कोकणातील सात जिल्ह्यांतील खारफुटीचे नव्याने सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. तसेच २,०११.३६ हेक्टर खारफुटीचे जंगल अद्यापही सिडको, जेएनपीएसह कोकणातील विविध जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत वन विभागाकडे हस्तांतरित केले नसल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे.

राज्यातील खारफुटीच्या अनियंत्रित विनाशामुळे पर्यावरणवाद्यांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले जात आहे. मुंबई न्यायालयाने आदेश देऊनही अनेक प्राधिकरणांकडून वन विभागाकडे खारफुटी जंगलांचे हस्तांतरण करण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे आता महाराष्ट्र मॅन्ग्रोव्ह सेलच्या आदेशानुसार महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर आणि पालघर या सात जिल्ह्यांमधील किनारपट्टीचा अभ्यास करत आहे.

पालघर जिल्हा आघाडीवरमुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २,०११.३६ हेक्टर खारफुटी जंगल अद्यापही वन विभागाच्या ताब्यात दिलेले असल्याचे अधिकृत नोंदीवरून दिसून येत आहे. यात उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या खारफुटी समितीच्या ताज्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार पालघर जिल्ह्यात अद्याप १२७७.५८ हेक्टर खारफुटीचा ताबा देणे बाकी आहे. याबाबत नवी मुंबईतील नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले की, २०११ हेक्टर म्हणजे सुमारे २०० आझाद मैदानांच्या आकाराऐवढे क्षेत्र असून, त्यांचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे.

सिडको, जेएनपीएचेही दुर्लक्षसिडकोनेही अद्याप आपल्या ताब्यातील मोठे खारफुटीचे क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित केले नसल्याकडे कुमार यांनी लक्ष वेधले. सागर शक्तीचे प्रमुख नंदकुमार पवार म्हणाले की, खारफुटीचे संवर्धन हा उरण आणि इतर भागांत दुर्लक्षित विषयांपैकी एक आहे. खारफुटी समितीने वारंवार निर्देश देऊनही स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. शेकडो हेक्टर खारफुटीवर सिडको आजही बांधकाम परवानगी देत असल्याची बाब धक्कादायक आहे. त्याचप्रमाणे जेएनपीएने आपल्या प्रकल्पांसाठी ७० हेक्टर खारफुटीचे क्षेत्र आपल्या ताब्यात ठेवले असून, ते त्यांनी तत्काळ वन विभागाकडे सोपवावे. वाटल्यास त्या क्षेत्राची गरज भासल्यास उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन ते पुन्हा घ्यावे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई