शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलात शहरवासीयांना मिळणार दिलासा, सवलत देण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 00:08 IST

तसेच वाढीव बिलासंदर्भातसुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबई : अगोदरच लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांना महावितरणने वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. ग्राहकांना मागील तीन महिन्यांची एकत्रित बिले पाठविण्यात आल्याने ती भरायची कशी, असा सवाल नागरिकांना सतावत आहे. परंतु ग्राहकांना थकीत देयके भरण्यासाठी महावितरणने सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाढीव बिलासंदर्भातसुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.नवी मुंबइतील वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सिडको गेस्ट हाऊसमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. महावितरणने अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली आहेत. ज्या ग्राहकाचे महिन्याचे बिल एक हजार रुपये आहे त्याला चक्क चार लाख रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे त्यांना तीन महिन्यांचे एकत्रित बिल भरता येणार नाही. बिल भरले नाही म्हणून त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नका. देयकाची थकबाकी रक्कम समान हप्त्यात विभागून द्या, अशा सूचना त्यांनी या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार वाढीव बिले कमी करण्यासाठी आणि मागणीनुसार वीज बिलाचे हप्ते पाडून देण्यास महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी तयारी दर्शविली आहे. त्यासाठी तीन विशेष अधिकाºयांची नियुक्ती करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. महावितरच्या या निर्णयामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या बैठकीला वडार समाज आर्थिक विकास समितीचे सभापती विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, राष्ट्रवादीचे सचिव प्रशांत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे, महावितरणचे अ. अभियंता राजाराम माने आदी उपस्थित होते.