शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
3
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
6
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
7
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
8
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
9
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
10
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
11
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
12
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
13
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
14
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
15
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
16
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
17
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
18
'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
19
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
20
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिडे पॅकेजच्या नावे शेकडोंची फसवणूक, फसवणूक झालेल्यांचा आकडा ३९०पेक्षा जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:21 IST

फ्युजन इंटरनॅशनल कंपनीने केलेल्या हॉलिडे पॅकेज घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. ३९० नागरिकांची यादी पोलिसांना मिळाली आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : फ्युजन इंटरनॅशनल कंपनीने केलेल्या हॉलिडे पॅकेज घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. ३९० नागरिकांची यादी पोलिसांना मिळाली आहे. यामधील ५५ नागरिकांनी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून फसवणूक झालेल्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.पामबीच रोडवर सानपाडा सेक्टर १७मधील द अफिअर या आलिशान इमारतीच्या १९ व्या मजल्यावर डिसेंबर २०१६च्या दरम्यान फ्युजन इंटरनॅशनल कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. कंपनी व्यवस्थापनाने कॉल सेंटरच्या माध्यमातून व रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त करून, हॉलिडे पॅकेज योजनेचा प्रचार सुरू केला. लकी ड्रॉसाठी निवड झाली असल्याचे सांगून, नागरिकांना कार्यालयात बोलावायचे व त्यांना एक ते दीड लाख रुपयांचे हॉलिडे पॅकेज आॅफर करायचे. ज्यांनी पैसे भरले त्यांनी हॉलिडे पॅकेजचा लाभ घेण्यासाठी संपर्क केल्यानंतर व्यवस्थापनाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. फोन करून व प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन पैसे परत मिळविण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केला; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर फसवणूक झालेल्या नागरिकांनी सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाला. प्रथम कंपनीचे संचालक विनय सोमपाल सिंग, विरेंद्र बालवीर सिंग, विशेष दिगांत व व्यवस्थापक दक्षय खरात विरोधात गुन्हा दाखल केला होता. यामधील विनय व दक्षयला पोलिसांनी जानेवारीच्या सुरुवातीस अटक केली होती. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.मुख्य आरोपी व कंपनी संचालक विरेंद्र सिंग व विशेष दिगांत यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती; परंतु सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने ग्राहकांना हॉलिडे पॅकेजचा लाभ द्या किंवा ५० लाख रुपये अनामत रक्कम जमा करा, असे सुनावले होते. यानंतर दोन्ही आरोपींनी सीबीडी न्यायालयात शरणागती स्वीकारली होती. सानपाडा पोलिसांनी त्यांना ३१ जानेवारीला अटक केली असून, त्यांना ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी फ्युजन इंडिया कंपनीच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त केली आहेत. नऊ महिन्यांमधील हॉलिडे पॅकेज दिलेल्या ग्राहकांची यादी पोलिसांच्या हाती सापडली आहे. तीन महिन्यांची यादी आरोपींनी गायब केली असण्याची शक्यता आहे. पोलिसांना तब्बल ३९० ग्राहकांची माहिती मिळाली आहे. याशिवाय बँक खात्यांच्या आधारेही माहिती संकलित केली आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या ४००पेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे.>तक्रार करण्याचे आवाहनफ्युजन इंटरनॅशनल कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी सुरुवातीला पाच ते सहा जणांनी सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. डिसेंबरअखेर तक्रार देणाºयांची संख्या २२ झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. आतापर्यंत ५५ जणांनी तक्रार दिली आहे.>आरोपी वाढणारहॉलिडे पॅकेज घोटाळ्यामध्ये आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे; परंतु प्रत्यक्षात या रॅकेटमध्ये १५ ते २० जणांचा समावेश आहे. कार्यालयात काम करणाºया कर्मचाºयांचाही यामध्ये हात असल्याचे बोलले जाते. आरोपींचा आकडाही वाढण्याची शक्यता असून, रॅकेटमध्ये सहभाग असलेल्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.>कोट्यवधींचा घोटाळाफ्युजन इंटरनॅशनल कंपनीने हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली फसवणूक केलेल्यांची संख्या ३९०पेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक नागरिकाकडून एक ते दीड लाख रुपये घेतले आहेत. काही जणांकडून ५० ते ६० हजार रुपयेही घेतले आहेत. जवळपास चार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.