शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डेब्रिज माफियांनी बंद केला रस्ता, रोडवर ५० डम्पर केले खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:18 IST

मोकळ्या भूखंड व खदानींमध्ये अनधिकृतपणे भराव करणाऱ्या डेब्रिज माफियांनी मुख्य रस्ता बंद केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

नवी मुंबई : मोकळ्या भूखंड व खदानींमध्ये अनधिकृतपणे भराव करणाऱ्या डेब्रिज माफियांनी मुख्य रस्ता बंद केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. एमआयडीसीमध्ये मुख्य रोडवर भराव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या माफियांवर कारवाई करण्याकडे पालिका प्रशासनही टाळाटाळ करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.घनकचरा व्यवस्थापनामध्ये नवी मुंबईला देशात प्रथम क्रमांक मिळाला असला, तरी शहरातील बांधकामाच्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा राबविण्यात प्रशासनास यश आले आहे. डेब्रिज माफियांनी मोकळ्या भूखंडावर भराव टाकण्याचा सपाटा लावला आहे. वाशी, नेरुळ, एमआयडीसीमधील बंद दगडखाणी, अडवली - भुतिवलीमधील शेतकºयांच्या जमिनीवर प्रचंड भराव करण्यात आला आहे. अतिक्रमण व डेब्रिज विरोधी पथक दुर्लक्ष करत असल्यामुळे माफियांची चलती सुरू झाली आहे. मुंबई व ठाण्यामधील बांधकामाचा कचरा नवी मुंबईमध्ये टाकणाºया टोळ्या तयार झाल्या आहेत. प्रत्येक वर्षी हजारो डम्परमधून हा कचरा शहरात आणला जात आहे. इंदिरानगरपासून पुढे गेल्यानंतर ‘डी’ ब्लॉकजवळ पूर्ण रस्ताच अडविला आहे. २०० मीटर लांबीच्या रोडवर ५० पेक्षा जास्त डम्पर खाली केले आहेत. या विषयी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. गुरुवारी रात्री दक्ष नागरिकांनी व शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी डम्पर पकडून महापालिकेच्या अधिकाºयांना त्या विषयी माहिती दिली; पण प्रत्यक्षात कोणीही अधिकारी व किंवा कर्मचारी घटनास्थळी आले नाहीत, यामुळे डेब्रिज विरोधी भरारी पथकाची मूक संमती असल्याचा संशय बळावू लागला आहे.महापालिकेने बनविलेल्या रोडवरच बांधकामाचा कचरा टाकूनही प्रशासन गप्प बसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माफियांना प्रशासनाची भीतीच उरलेली नाही. वेळेत लक्ष दिले नाही तर येथील नैसर्गिक नाल्यामध्येही डेब्रिज टाकले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी येथील नाल्यात भराव केला होता; परंतु नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर डेब्रिज बाहेर काढले होते. अतिक्रमण झाल्यास पावसाळ्यात पावसाचे पाणी कंपन्यांमध्ये घुसून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.