शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

पाम बीचलगतच्या कांदळवन क्षेत्रात डेब्रिजचे भराव

By कमलाकर कांबळे | Updated: April 14, 2024 20:27 IST

पर्यावरणप्रेमींचा संताप : खारफुटी कक्षाच्या पथकाने केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पामबीच मार्गावरील बॅरिकेड्स तोडून लगतच्या खारफुटीवर डेब्रिज टाकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे सीवूड्स येथील चाणक्य तलावाचे अस्तित्वसुद्धा धोक्यात आले आहे. या परिसरात दिवसाढवळ्या डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या जात असल्याने संबंधित विभागाच्या सुस्त आणि उदासीन कारभाराविषयी पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात वाढत्या तक्रारीची दखल घेत खारफुटी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

नवी मुंबई सीवूड्स येथील चाणक्य तलाव संरक्षित करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सिडको आणि महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी तलावाभोवती कुंपण घालण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित विभागाकडून त्याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. विशेष म्हणजे पामबीच मार्गालगतचे बॅरिकेड्स तोडण्यात आले आहेत. त्यामुळे डेब्रिजने भरलेले डम्पर आत जाणे सोपे झाले आहे. चाणक्य तलाव आणि त्याच्या आजूबाजूचे खारफुटीचे क्षेत्र सिडकोच्या आधिपत्याखाली येते. या परिसरातील सुमारे ३२ हेक्टर क्षेत्र बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन तेथील तलाव बुजवून त्या ठिकाणी टोलेजंग इमारती बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. याविरोधात निसर्गप्रेमींनी मागील चार महिन्यांपासून साप्ताहिक आंदोलन छेडले आहे. विशेष म्हणजे सिडकोने आपल्या ताब्यातील सर्व खारफुटी प्रदेश वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र सिडकोच्या संबंधित विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला जात आहे. यातच चाणक्य तलावासह पामबीच मार्गालगतचे खारफुटी क्षेत्रसुद्धा डेब्रिजमाफियांचे भक्ष्यस्थानी आले आहे.

संबंधित विभागाच्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास केला जात आहे. यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल घेऊन खारफुटी तक्रार निवारण समितीने गेल्या महिन्यात मॅग्रोज सुरक्षा ॲप तयार केला आहे. या ॲपवर प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत खारफुटी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात या परिसराला भेट देऊन पाहणी केली. असे असले तरी या पाहणीचा निष्कर्ष काय, खारफुटी आणि कांदळवन क्षेत्राच्या संरक्षणासाठी ठोस कार्यवाही करणार का, असा सवाल आता निसर्गप्रेमींनी उपस्थित केला आहे.