शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानास हरताळ, महापालिकेच्या आवारातच डेब्रिजचे ढिगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:51 IST

शहर स्वच्छतेसाठी दिवस-रात्र धावपळ करणा-या महापालिका प्रशासनाचे मनपा मुख्यालयातील डेब्रिजच्या ढिगा-याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. अनेक महिन्यांपासून डेब्रिज इमारतीच्या बाहेर पडले असून ते उचलले जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : शहर स्वच्छतेसाठी दिवस-रात्र धावपळ करणा-या महापालिका प्रशासनाचे मनपा मुख्यालयातील डेब्रिजच्या ढिगा-याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. अनेक महिन्यांपासून डेब्रिज इमारतीच्या बाहेर पडले असून ते उचलले जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये आघाडी घेतली आहे. माझा कचरा माझी जबाबदारी, माझे शहर माझा अभिमान ही घोषवाक्ये घेवून शहरभर जनजागृती सुरू केली आहे. शहरात कुठेही कचºयाचे ढिगारे, डेब्रिज दिसले तर स्वच्छता अ‍ॅपवर फोटो पाठवा, चोवीस तासामध्ये कचरा साफ केला जाईल, असे आश्वासन महापालिकेचे अधिकारी देत आहेत. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखलही घेतली जात आहे. स्वच्छता अभियानासाठी अधिकारी व कर्मचाºयांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारीही कर्मचाºयांना काम करावे लागत आहे. शहरभर अभियान प्रभावीपणे राबविणाºया प्रशासनाचे मुख्यालयातील कचºयाकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. कँटीनच्या बाहेरील बाजूला अनेक महिन्यांपासून डेब्रिजचा ढिगारा पडला आहे. पालिका अधिकारी व कर्मचारी रोज येथून ये - जा करत असूनही हा कचरा उचलण्याकडे लक्ष दिले जात नाही. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. व सर्व अधिकारी शहरातील रेल्वे स्टेशन, बस डेपो, प्रत्येक विभागात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करत फिरत आहेत. परंतु अधिकाºयांना मुख्यालय परिसराचा दौरा करण्यास अधिकाºयांना वेळ नाही असे चित्र निर्माण झाले आहे. डेब्रिज कधी उचलले जाणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील मोठा भाग अद्याप विकसित करण्यात आलेला नाही. या माळ्यावर जमिनीवर लादीही टाकण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी साहित्य अस्ताव्यस्त पडले असल्याचे चित्र आहे. विविध विभागांमध्ये कोपºयामध्ये कुठेही फाईलचे गठ्ठे ठेवण्यात आले आहेत. मुख्यालयामध्ये साफसफाई चांगली होत असली तरी डेब्रिज व इतर कचरा कधी हटविला जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महानगरपालिकेचे विभाग कार्यालय, रुग्णालय व शाळांच्या इमारतींमध्ये अनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात पडले आहे. काही इमारतींच्या बाहेरील ठिकाणी भंगार गोडाऊनचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे शहर स्वच्छतेला बाधा येऊ लागली आहे. नागरिकांना स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करताना प्रशासनाने स्वत:च्या इमारती व परिसर प्रथम स्वच्छ ठेवावा, असे आवाहन शहरातील दक्ष नागरिकांनी केले आहे.हाताची सफाईमनपा मुख्यालयाच्या प्रसाधनगृहामध्ये हात धुण्यासाठी डेटॉलचे हँडवॉश ठेवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात बॉटल डेटॉलच्या असून आतमधील लिक्वीड सोप दुसºयाच कंपनीचा आहे. त्याचा दर्जाही चांगला नसल्याच्या तक्रारी नागरिक करू लागले असून याची चौकशी करण्याचीही मागणी होत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNavi Mumbaiनवी मुंबई