शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:42 IST

भरदिवसा ठिकाणी डेब्रिज टाकले जात असल्याने पालिकेची झीरो डेब्रिज संकल्पना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गालगत वाशी गाव येथे मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव टाकला जात आहे. यामुळे खारफुटीची हानी होत असून, सौंदर्यीकरणातही बाधा निर्माण झाली आहे. मात्र, भरदिवसा त्या ठिकाणी डेब्रिज टाकले जात असल्याने पालिकेची झीरो डेब्रिज संकल्पना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.पालिकेची झीरो डेब्रिज संकल्पना अद्यापही कागदावरच आहे. रस्त्यावर अथवा मोकळ्या मैदानात डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाईसाठी भरारी पथक देखील तयार करण्यात आले होते. त्यांनाही डेब्रिजमाफियांवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलेले आहे. यामुळे शहरात जागोजागी, रस्त्यालगत डेब्रिजचे ढीग साचल्याचे पाहायला मिळत आहे. तर नजरेसमोर त्याठिकाणी डेब्रिज टाकले जात असतानाही पालिका अधिकाºयांकडून कारवाईला चालढकल होत आहे. यामुळे घणसोलीतील पाम बीच मार्गासह सायन-पनवेल मार्गालगत डेब्रिजचे ढीग साचल्याचे पाहायला मिळत आहे.डेब्रिजमाफियांकडून सुरू असलेल्या या प्रकारामुळे तिथल्या खारफुटीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. रस्त्यालगत साचलेल्या डेब्रिजच्या ढिगाºयांमुळे परिसराच्या सौंदर्यीकरणात बाधा निर्माण होत आहे. एकीकडे नवी मुंबई महापालिकेवर विविध प्रकारच्या पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. राहण्यास उत्तम शहरांमध्ये नवी मुंबईचा उल्लेख देशात दुसरा झालेला आहे. यामुळे इतर शहरवासीयांच्या नजरा नवी मुंबईकडे लागलेल्या आहेत.अशात शहराच्या प्रवेशद्वारावरच साचलेले डेब्रिजचे हे ढीग शहराची प्रतिमा मलिन करण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे डेब्रिजमाफियांवर कारवाईस होत असलेल्या चालढकलीचा संताप पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई