शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत उपचार न मिळाल्याने एकाचा मृत्यू; नेरुळमधील रुग्णालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 23:41 IST

खारघर येथे राहणारे ६२ वर्षीय साधू कदम यांना १५ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, त्यांना खारघरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

नवी मुंबई : खारघरमधील कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असताना, नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात आवश्यक सुविधा मिळण्यास विलंब झाल्याने रुग्ण दगावला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे, रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

खारघर येथे राहणारे ६२ वर्षीय साधू कदम यांना १५ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, त्यांना खारघरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. कदम यांची कोरोना तपासणी केली असता, पॉझिटिव्ह अहवाल आला होता. खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार घेतल्यावर नातेवाईकांनी उपचारासाठी नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याची विनंती पनवेल महापालिकेकडे केली होती. त्यानुसार, शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी बेड उपलब्ध करून देण्यात आल्याने, कदम यांना डी.वाय.पाटील रुग्णालयात हलवले होते, परंतु रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने उपचार करण्यास विलंब झाला आणि कदम यांचे निधन झाल्याचा आरोप कदम यांचे जावई अतुल सपकाळ यांनी केला आहे.शनिवारी रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नव्हता, परंतु पनवेल महापालिकेचे नोडल ऑफिसर मनोजकुमार शेट्टे यांनी रुग्णालयात एक बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, आयसीयूमध्ये एक बेड उपलब्ध करून दिला होता. रुग्णाला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाठविण्यास सांगितले होते, परंतु रुग्ण वेळेवर न आल्याने साडेसात वाजता अचानक आलेल्या दुसऱ्या रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने त्यांना तो बेड देण्यात आला. सदर रुग्ण साडेनऊ वाजता रुग्णालयात आला. त्यानंतरही आम्ही तत्काळ उपचार सुरू केले होते. एक तासात या रुग्णाला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर बेडही उपलब्ध करून दिला होता, परंतु दुर्दैवाने पहाटे त्यांचे निधन झाले. - राहुल पेड्डावाड, सीईओ डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय, नेरुळ

टॅग्स :doctorडॉक्टर