शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूप्रकरणी बिल्डरवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:16 IST

लिफ्टच्या मोकळ्या जागेतून पडून चेतन खराडे (१४) याच्या मृत्यूची घटना दिघा येथे घडली आहे. याप्रकरणी इमारतीचे मालक (बिल्डर) जगदीश खांडेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई - लिफ्टच्या मोकळ्या जागेतून पडून चेतन खराडे (१४) याच्या मृत्यूची घटना दिघा येथे घडली आहे. याप्रकरणी इमारतीचे मालक (बिल्डर) जगदीश खांडेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिफ्ट बसवण्याची जागा उघडी असल्याने अपघाताची शक्यता असतानाही रहिवाशांनी सांगून देखील दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला आहे.दिघा येथील ओंकारेश्वर प्लाझा इमारतीमध्ये शुक्रवारी ही दुर्घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारा चेतन खराडे (१४) हा घरासमोरील मोकळ्या जागेत उभा होता. त्याठिकाणी त्याचे काही मित्र कॅरम खेळत होते. यावेळी चेतनचा तोल जाऊन तो लिफ्ट बसवण्यासाठी बनवलेल्या मोकळ्या जागेतून खाली कोसळला. मात्र त्याला उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी चेतन याचे वडील परशुराम खराडे यांनी इमारत व जागेचे मालक जगदीश खांडेकरविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे.ओंकारेश्वर इमारतीमधील रहिवाशांनी लिफ्टसाठी मोकळी सोडलेली जागा धोकादायक असल्याची तक्रार अनेकदा खांडेकर याच्याकडे केलेली. मात्र त्यांनी दुर्लक्ष करून लिफ्ट बसवण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या सात मजली इमारतीमधील सुमारे २८ घरांमधील रहिवासी घराबाहेर निघताना जीव मुठीत धरून निघायचे. अखेर शुक्रवारी चेतन याचा त्याच जागेतून पडून मृत्यूची घटना घडली. यामुळे सदर दुर्घटनेला इमारत मालक कारणीभूत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या