शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील गटारांची कामे अपूर्णच, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 00:03 IST

नवी मुंबई शहरात मान्सूनपूर्व कामे जलद गतीने सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मान्सूनपूर्व कामे जलद गतीने सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. परंतु अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना देखील गटारांच्या दुरु स्तीसाठी खोदकामे सुरू असून कामे अपूर्ण आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे आव्हान असून घाईगडबडीत होणाऱ्या कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.नवी मुंबई महापालिकेच्यावतीने गटारे सफाई तसेच नालेसफाई, वृक्ष छाटणी आदी मान्सूनपूर्व कामे केली जातात. तसेच शहरातील इतर सर्व प्राधिकरणांच्या परस्पर संपर्कात राहून मान्सूनपूर्व कामाचे पूर्वनियोजन केले जाते. यावर्षी शहरात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी घेऊन १६ मे रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत महापालिकेमार्फत करण्यात येणारी पावसाळापूर्व गटारे सफाई तसेच नालेसफाईची कामे २५ मेपर्यंत पूर्ण करावीत तसेच निविदा प्रक्रि येला काहीसा उशीर झालेली नालेसफाईची सहा कामे ३0 मेपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश दिले होते. त्यासोबतच पालिका क्षेत्रातील इतर प्राधिकरणांनी २५ मेपर्यंत पावसाळी कालावधीतील त्यांच्याशी संबंधित आवश्यक कामे पूर्ण करावीत असे सूचित केले होते. विविध प्राधिकरणांना त्यांच्या केबल, पाइपलाइन टाकण्यासाठी देण्यात येणारी रस्त्यावरील खोदकामांची परवानगी पूर्णत: बंद करून ३0 मेपर्यंत रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची कामे पूर्ण करावीत असे निर्देशित केले होते. परंतु पावसाळा येऊन ठेपला तरी शहरातील विविध भागात गटारांच्या दुरु स्तीसाठी खोदकामे केली असून कामे अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. वाशी सेक्टर ३ आणि ४ भागातील गटारे दुरुस्तीच्या कामासाठी खोदून ठेवली असून पावसाळा सुरू होणार असल्याने कामे पूर्ण करण्यासाठी घाई होणार आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जावर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.