शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’तील धोकादायक इमारतींचाही होणार पुनर्विकास; ३० वर्षे जुन्या इमारतींना मिळणार ३० टक्के जादा चटईक्षेत्र

By नारायण जाधव | Updated: March 26, 2024 18:24 IST

लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा निर्णय घेऊन नगरविकास विभागाने ‘नैना’तील धोकादायक इमारतींसह ३० वर्षे जुन्या इमारतींचा ३० टक्के जादा चटईक्षेत्रासह पुनर्विकासास मान्यता दिली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात ‘नैना’ क्षेत्रातील १५२ गावांना शासनाने आपली एकात्मिक बांधकाम विकास नियंत्रण नियमावली अर्थात युपीडीसीआर लागू केली आहे. आता या परिसरातील स्थानिकांच्या मागणीवरून नगरविकास खात्याने परिसरातील ३० जुन्या इमारती, बांधकामांनाही पुनर्विकास योजना लागू केली आहे.

लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा निर्णय घेऊन नगरविकास विभागाने ‘नैना’तील धोकादायक इमारतींसह ३० वर्षे जुन्या इमारतींचा ३० टक्के जादा चटईक्षेत्रासह पुनर्विकासास मान्यता दिली आहे. नगरविकास विभागाच्या निर्णयामुळे ‘नैना’तील क्षेत्रातील १५२ गावे विशेषत: पहिल्या टप्प्यातील २३ गावांना सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण ही गावे नवी मुंबईसह पनवेल, कल्याण-डाेंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या वेशीवरील असून, येथे सर्वाधिक विकास झालेला आहे.

असे मिळणार चटईक्षेत्र

१ - ‘नैना’ क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या किंवा ३० वर्षे जुन्या इमारतींना ३० टक्के जादा चटईक्षेत्र किंवा त्या इमारतीतील सदनिकाधारकांना प्रत्येकी १५ चौरस मीटर बांधकाम अतिरिक्त बांधकाम कोणताही प्रीमियम न भरता करता येईल. त्यापेक्षा जादा चटईक्षेत्र हवे असल्यास शासनास नियमानुसार प्रीमियम भरून करता येईल.

२ - बंगलोधारकांना अतिरिक्त चटईक्षेत्राचा कोणताही लाभ मिळणार नाही.३ - ज्या सदनिकाधारकांच्या घराचे कारपेट क्षेत्रफळ २७.८७ चौरस मीटरपेक्षा कमी आहे, त्यांना कोणताही प्रीमियम न भरता ते २७.८७ चौरस मीटरपर्यंत वाढीव बांधकाम करता येईल.४ - धोकादायक किंवा ३० वर्षे जुन्या इमारतीत राहत असलेल्या विद्यमान रहिवाशांनाच नवी पुनर्विकास योजना लागू असेल.५ - भाडेकरू असलेल्या इमारतींनाही अटी व शर्तीनुसार पुनर्विकास योजना लागू असेल. मात्र, त्यांना शासन नियमानुसार प्रीमियम भरून वाढीव चटईक्षेत्र आणि टीडीआरचा लाभ घेता येईल.‘नैना’ क्षेत्रातील १५२ गावांना शासनाने लागू केलेल्या एकात्मिक बांधकाम विकास नियंत्रण नियमावली अर्थात युपीडीसीआरमध्ये १५ मार्च २०२३ पासून धोकादायक किंवा ३० वर्षे जुन्या इमारतींना पुनर्विकास याेजनेच्या तरतुदी नव्याने अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.