शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर अपघातांचा धोका; पावसामुळे उड्डाणपुलावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 05:32 IST

पहिल्याच पावसामुळे सायन-पनवेल मार्गावर शिरवणे तसेच उरण फाटा येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत.

नवी मुंबई : चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सायन-पनवेल मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असून, रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण होत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात सायन-पनवेल मार्गावर जागोजागी खड्डे पडत असल्याने तिथल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.पहिल्याच पावसामुळे सायन-पनवेल मार्गावर शिरवणे तसेच उरण फाटा येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे त्याठिकाणी छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यापैकी काही खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे. यानुसार शिरवणे पुलालगत भर पावसात खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे चित्र रविवारी दिसत होते. मात्र उरण फाटा येथील पुलावर देखील सीबीडीकडे जाणाऱ्या लेनवर खड्डे पडले आहेत. गतवर्षी देखील या पुलावर खड्डे पडले होते, तर शिरवणे येथील संपूर्ण पुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांपासून संपूर्ण ठाणे-बेलापूर मार्गाच्या दुरुस्ती कामांतर्गत सातत्याने खड्डे पडणाºया ठिकाणांचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतरही अवघ्या चार दिवसांच्या पावसामुळे या दुरुस्तीकामांच्या दर्जाचा भांडाफोड झाला आहे. या खड्ड्यांच्या ठिकाणी वाहनांची गती मंदावत असल्याने वाहतूककोंडी होत आहे. तर रात्रीच्या वेळी हे खड्डे दुचाकीस्वारांच्या नजरेस न पडल्यास अपघात घडून जीवितहानी होवू शकते. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण होत आहे. गतवर्षी पावसाळ्यात अशाच खड्ड्यांमुळे घडलेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यानंतर मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड देखील केली होती. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरवातीलाच सायन- पनवेल मार्गावर खड्डे दिसू लागले आहेत. त्यामुळे अपघातांच्या घटनांमधून घडणारी मृत्यूची मालिका यंदाही सुरूच राहणार का ? असा संतात प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई