शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

दादोजी कोंडदेवांचा ‘तो’ पुतळा पुन्हा लावावा

By admin | Updated: October 28, 2014 22:59 IST

आम्ही किल्ले बनवतो पण कुठल्याही स्पर्धेसाठी नाहीत, तर छ.शिवाजी महाराजांचे कर्तृत्व अजरामर राहून त्यांच्या स्मृती चिरंतन टिकवण्याचा हा प्रांजळ प्रय} आहे.

अनिकेत घमंडी- डोंबिवली 
आम्ही किल्ले बनवतो पण कुठल्याही स्पर्धेसाठी नाहीत, तर छ.शिवाजी महाराजांचे कर्तृत्व अजरामर राहून त्यांच्या स्मृती चिरंतन  टिकवण्याचा हा प्रांजळ प्रय} आहे. आमच्या पिढीर्पयत त्यांचे महान कार्य पोहचल़े परंतु, ते पुढच्या पिढीर्पयत जसेच्या तसे जावे हा उद्देश. याच उद्देशाने संगितावाडीतील आशापुरी इमारतीसह परिसरातील काही युवक दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. 
दरवर्षी किल्ला बनवतांना सामाजिक संदेश देऊन समस्त डोंबिवलीकरांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येतात. त्यासाठीच यंदा ‘गडांचा राजा किल्ले राजगड’ची प्रतिकृती बनविण्यात आली असून पुण्यातील ‘ दादोजी कोंडदेव’ यांचा पुतळा पुन्हा बसविण्यासाठी डोंबिवलीकर इतिहासप्रेमींना आवाहन करण्यात येत आहे.
गड किल्ले संवंर्धनासोबतच इतिहास चिरंतन टिकवण्यासाठी या युवकांनी धडपड मोहीम राबवली आहे. त्याचनिमित्ताने जेथे दादोजीं कोंडदेवांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी बसविण्यात यावा ही मागणी करण्यासाठी स्वाक्ष:या गोळा करण्याचे धाडस त्यांनी केले असून दिवाळी निमित्ताने त्या मुख्य उद्देशासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आल्याचे या संकल्पनेचा म्होरक्या व्यवसायाने विद्युत अभियंता अमेय काटदरे याने सांगितले. त्याच्यासोबत कुशल देवळेकर (आय टी), रोहीत गोवेकर (केमी. इंजी.), मंगेश पारधी, मंगेश काटदरे, गोविंद मांजरेकर, प्रथमेश पंडीत, आदीश भगत, अमित देशमुख, आशीष दळवी, कल्पेश शहा, पौर्णिमा टमके, आदिती भगत , गौरी गोवेकर आदींसह अबालवृद्ध या उपक्रमात सहभागी आहेत.
गेल्या वर्षी तोरणा गड केला होता, त्याच दरम्यान या मंडळींनी राजगड स्वारी केली होती. त्यामुळे त्याची प्रतिकृती करण्याचा चंग त्यांनी बांधला होता़  पुढील वर्षासाठीही सिंहगड, विशाल गड, तुंग गड आदींसह अन्य गडकिल्लयांची माहिती गोळा करून त्या ठिकाणापैकी एका ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्याची प्रतिकृती निर्माण करण्याचा प्रय} असल्याचे तो सांगतो.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण स्वराज्य बघू शकतो, अनुभवू शकतो. मुघल साम्राज्याचा नायनाट करून दिल्लीचे तख्त फोडण्याचा प्रचंड असा इतिहास आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. अध्यात्म, गुरुवंदन, मातृभक्ती, संस्कार, परंपरा, संस्कृती, पर स्त्री माते समान, फितुरीला दंड, गद्दाराला शासन यासह सुशासन यांसह सुयोग्य नियोजन आदीचे अनेक दाखले महाराजांचा अभ्यास केल्यास मिळतात. त्यांचा वारसा नेमका आपण जपतो आहोत का? त्यातील एक तरी गोष्ट आपण करतो आहोत का? त्यांच्याकाळी संदेश वहनाच्या कोणत्याची अद्ययावत सुविधा नसतांना, दळणवळणाची साधने नसतांनाही केवळ ‘विश्वास’ या एकमेव धाग्यावर त्यांनी शेकडो युद्धे केली-जिंकली. 
अनेक गड किल्ले काबीज केले. हे सध्याच्या राजकारण्यांना जमते आहे का? तर ते अस्तित्वात आणण्यासाठी सचोटी, पारदर्शक व्यवहार आणि दुस-याचा सन्मान, एकात्म निष्ठा आदी महत्वाची असत़े सध्या मात्र तसे दिसत नाही, आणि ठिकठिकाणी ‘जाणता राजा’च्या पाटय़ा मात्र झळकतांना दिसतात. त्या सर्वानी अंतमरुख होऊन विचार करण्याची वेळ आली असल्याचे प्रचंड उद्वेगाने त्या युवकांनी सांगितले. या सा-याची खंत असून खारीचा वाटा उचलण्यासाठीच या उपक्रमातून जनजागृती करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे अमेय सांगतो.
 
राजगडावर काय बघाल : पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची, बाले किल्ला, पद्मावती तलाव, रामेश्वराचे मंदिर, पाली दरवाजा, सुळे दरवाजा, गुंजवणो, महादरवाजा, सई बाईंची समाधी, राजवाडा, दारु कोठार आदीची माहिती देण्यात आली आहे.
 
राजगडावरच्या महत्वाच्या घटना -  
1647 - छ. शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला, 
1649 - गडाची डागडुजी, 
11 जुलै 1659 - अफझलखानाला भेटण्यासाठी महाराज प्रतापगडावर, 
5 सप्टें. 1659- सईबाईचा गडावर मृत्यू, 
जुलै 166क् - पन्हाळगडावरुन महाराज राजगडावर, 
1661 - भवानी माता माँ साहेबांना दाखवण्यासाठी गडावर, 1664 - सुरतेची लुट गडावर आणण्यात आली, 
1665 - मुघलांचा गडावर अयशस्वी हल्ला, 
24 फेब्रु.167क् - राजाराम महाराजांचा जन्म, 
1689 - संभाजींच्या वधानंतर मुघलांनी गड जिंकला, 
1818 - गड इंग्रजांच्या ताब्यात.