शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

२७० दंत खुर्च्यांची परवानगी, मात्र ३५० खुर्च्यांचा वापर; खारघरच्या पोळ फाउंडेशनमधील प्रकार 

By नारायण जाधव | Updated: February 8, 2023 20:21 IST

खारघर येथील डी. जी. पोळ फाउंडेशनने आपल्या डेंटल कॉलेजला २७० दंत खुर्च्यांची परवानगी असताना ३५० खुर्च्यांचा वापर सुरू केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

नवी मुंबई: खारघर येथील डी. जी. पोळ फाउंडेशनने आपल्या डेंटल कॉलेजला २७० दंत खुर्च्यांची परवानगी असताना ३५० खुर्च्यांचा वापर सुरू केल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढेच नाही तर संस्थेने १० हजार १७ चौरस मीटरचे वाढीव बांधकाम पर्यावरण विभागाची एनओसी न घेताच केल्याची हरकत प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. यामुळे याचा खुलासा करण्यासह संस्थेचे लेखापरीक्षण केलेले ताळेबंद सादर करण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत. यामुळे फाउडेशनने सादर केलेला वाढीव खुर्च्या वापरण्याचा प्रस्तावही प्रदूषण नियंत्रण मंडळाने तूर्तास नाकारला आहे.

पोळ फांउडेशनचे खारघर सेक्टर ४मध्ये भूखंड १६, १६ अ आणि १८ वर २८,९७२ आणि २४२०७ चौरस क्षेत्रफळावर ४४० खाटांसह ३५० डेंटल खुर्च्यांचे वैद्यकिय महाविद्यालय आहे. यात २७० खुर्च्यांनाच परवानगी आहे. परंतु, त्या ठिकाणी विनापरवानगी ३५० खुर्च्यांचा वापर सुरू असल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यास संमती समितीने काढला आहे. याशिवाय पोळ फाउंडेशनने १० हजार १७ चौरस मीटरचे वाढीव बांधकाम पर्यावरण विभागाची परवानगी न घेताच केल्याचे संमती समितीचे म्हणणे आहे.

वाढीव खुर्च्यांसाठी पोळ फाउंडेशनने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवागनी मागितली होती. त्यावेळी मंडळाच्या संमती समितीने आपल्या १८ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत संस्थेच्या अनागोंदी कारभाराविषयी हे गंभीर निष्कर्ष काढले आहेत. यानंतर संमती समितीने १० हजार १७ चौरस मीटरचे वाढीव बांधकाम करण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेतली होती, का अशी विचारणा करून त्याचे प्रमाणपत्र सादर करण्यासह फाउंडेशनचा लेखा परीक्षण केलेला ताळेबंद सादर करण्यास सांगून संस्थेने मागितलेली वाढीव खुर्च्यांची मंजुरी तूर्तास नाकारली आहे. विद्यार्थ्यांच्या भूमिकेकडे लक्षप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिलेल्या या दणक्यानंतर पोळ फाउंडेशनच्या दंत महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी काय पवित्रा घेतात, पर्यावरण परवानगी न घेता केलेल्या वाढीव बांधकामाबाबत फाउंडेशन आता काय खुलासा करते यासह लेखा परीक्षण केलेल्या ताळेबंद सादर करते किंवा नाही, याकडे लक्ष लागले आहे.

  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई