शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांच्या गर्दीने पनवेल रेल्वे परिसर गजबजला, सामाजिक अंतराचा फज्जा; मास्कचा वापरही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 08:32 IST

पनवेल रेल्वे स्थानकातून दिवसाआड गोरखपूर एक्स्प्रेस जात आहे. त्यानुसार पनवेल परिसरातील परप्रांतीय गावी जाण्यासाठी शनिवारी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती.

कळंबाेली : पनवेलरेल्वे स्थानकाबाहेर शनिवारी गोरखपूर एक्स्प्रेसकरिता रेल्वे परिसरात परप्रांतीयांची गर्दी उसळली होती. गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. काहींच्या तोंडावर मास्क न घातलेले परप्रांतीय रेल्वे परिसर आवारात फिरत होते. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत कोरोनाला आमंत्रण देण्याचे काम यावेळी होत आहे. पनवेल रेल्वे स्थानकातून दिवसाआड गोरखपूर एक्स्प्रेस जात आहे. त्यानुसार पनवेल परिसरातील परप्रांतीय गावी जाण्यासाठी शनिवारी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. दुपारी दीडच्या सुमारास गर्दी उसळल्याने पनवेल रेल्वे स्थानक परिसर परप्रांतीय प्रवाशांनी गजबजला होता. रेल्वे स्थानकाबाहेर तसेच आवारातील इतर जागोजागी आपले सामान घेऊन झाडांच्या सावलीचा आधार घेत थांबले होते.  यात महिला, लहान मुलांचा समावेश होता. काहींच्या तोंडावर मास्क नव्हते. त्यात गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याने सामायिक अंतराचे तीनतेरा वाजले. १४ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. मध्यंतरी गावी जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली होती. त्यानंतर शनिवारी गोरखपूर एक्स्प्रेसमधून जाणाऱ्या परप्रांतीय प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. हाताला काम नसल्याने आपल्या स्वगावी जाण्यासाठी कित्येक मजूर, कामगार रेल्वे स्थानक गाठत आहेत.

बिहार, उत्तर प्रदेश जाणाऱ्यांची संख्या मोठीपनवेल, उरण, पेण , अलिबाग , कळंबोली , कामोठे , खारघर , तळोजा एमआयडीसी वसाहत ,शिळफाटा परिसरात काम करणारे बिहार व उत्तर प्रदेशकडील बहुतांश मजूर या परिसरात राहतात. काम बंद असल्याने गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांत वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसाआड गोरखपूर जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpanvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबईrailwayरेल्वे