शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: साहिलच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, तिघे अल्पवयीन, भेटीसाठी बोलावून काढला काटा 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 20, 2022 18:58 IST

Crime News: कोपर खैरणे येथे अल्पवयीन मुलाच्या हत्येची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यातले तिघे अल्पवयीन आहेत. साहिल सोबतच्या वादातून त्यांनी त्याला भेटीसाठी बोलावून काटा काढल्याचे समोर आले आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोपर खैरणे येथे अल्पवयीन मुलाच्या हत्येची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यातले तिघे अल्पवयीन आहेत. साहिल सोबतच्या वादातून त्यांनी त्याला भेटीसाठी बोलावून काटा काढल्याचे समोर आले आहे.

कोपर खैरणे सेक्टर १५ येथे राहणाऱ्या साहिल गोळे (१७) याची डोक्यात दगड घालून व पोटावर धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली होती. बारावीचे शिक्षण घेणारा साहिल हा एका कंपनीत रात्रीपाळीवर काम देखील करायचा. मंगळवारी रात्री तो कामावर गेला असता, हजेरी लावून पुन्हा कोपर खैरणेत आला होता. दरम्यान त्याचे आईसोबत बोलणे झाले असता त्याने तो कामावर असल्याचे सांगितले होते. मात्र बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सेक्टर २३ येथील मैदान लगत आढळून आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असता, अधिक चौकशीत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यात तिघे अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधार गृहात रवानगी केली जाणार आहे. तर चौथ्या साथीदाराचे नाव संकेत उर्फ सन्नी पवार (२०) असून तो देखील त्याच परिसरात राहणारा आहे. त्यांचा साहिल सोबत वाद झाला होता असे समोर आले आहे. या वादातून मंगळवारी रात्री ते समोरासमोर आले असता, चौघांनी मिळून साहिलचा कायमचा काटा काढला. यामध्ये इतर काही कारण आहे का ? व इतर कोणाचा समावेश आहे का ? याचा अधिक तपास कोपर खैरणे पोलीस करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक