शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोली दुर्घटना प्रकरण : पालिकेसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 03:45 IST

अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीच्या इन्सुलेटरचा स्फोट होऊन महिला गंभीर झाल्याप्रकरणी पालिकेसह महापारेषणच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीच्या इन्सुलेटरचा स्फोट होऊन महिला गंभीर झाल्याप्रकरणी पालिकेसह महापारेषणच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर जखमी महिला मृत्यूशी झुंज देत असून, घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी त्यांच्या नातेवाइकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार रबाळे पोलीसठाण्यात दोन्ही प्रशासनाच्या अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऐरोली सेक्टर ५ येथील अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनी खालील जागेत पालिकेने विकसित केलेल्या उद्यानात २ आॅगस्टला हा अपघात घडला होता. उच्चदाबाच्या वायरच्या इन्सुलेटरचा स्फोट होऊन त्याचा एक तुकडा उद्यानातून चाललेल्या मृणाल महाडिक (५२) यांच्या डोक्यात पडला होता. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर मुलुंडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर दुस-याच दिवशी महापारेषणच्या अधिकाºयांनी त्यांना अडीच लाखांची मदत केली. त्याशिवाय अधिक मदतीसाठी देखील महापारेषणचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. मात्र, पालिका अधिकारी व महापारेषण यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा जखमी मृणाल महाडिक यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. यानुसार त्यांचा मुलगा राजदत्त यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती; परंतु रबाळे पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हे दाखल करण्यास चालढकल होत होती. अखेर परिमंडळ उपआयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर दहा दिवसांनी रबाळे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात महापालिका व महापारेषण अधिकाºयांचा समावेश आहे. उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीखाली उद्यान उभारू नये, असे लेखी पत्र महापारेषणच्या अधिकाºयांनी पालिका अधिकाºयांना दिलेले आहे, यामुळे ऐरोलीतील दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :electricityवीजNavi Mumbaiनवी मुंबई