शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जप्तीतल्या गाळ्यांचे पतसंस्थेने सील तोडले 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 26, 2023 12:41 IST

नेरूळची घटना : महालक्ष्मी पतसंस्थेच्या तिघांवर गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कर्जाच्या थकबाकीमुळे बँकेने जप्त केलेल्या गाळ्यांचे सील तोडून ते भाड्याने दिल्याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये लहालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष संभाजी आढळराव यांच्यासह दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ५८ लाखाच्या कर्जवसुलीवरून जप्तीची हि कारवाई करण्यात आली होती. 

द डेक्कन मर्चंट को ऑप बँकेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळच्या महालक्ष्मी नागरी सेवा सहकारी पतसंस्थेने डेक्कन बँकेकडून ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे ४० लाख रुपयांचे कर्ज व १८ लाख व्याज अशी ५८ लाखाची थकबाकी पतसंस्थेकडे होती. मात्र त्याचा एकही हप्ता न भरल्याने पतसंस्थेचे नेरुळ येथील २४ गाळे बँकेने ताब्यात घेऊन ते सील केले होते. परंतु २०१० मध्ये हि कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याची पाहणी करण्यात आली नव्हती. याचाच फायदा घेत महालक्ष्मी पतसंस्थेने गाळ्यांचे सील तोडून ते भाड्याने दिले होते. चार महिन्यांपूर्वी हा प्रकार समोर आल्यानंतर बँकेने पतसंस्थेचे अध्यक्ष संभाजी आढळराव यांना न नोटीस बजावली होती. त्यावेळी त्यांनी बँकेला १० लाख रुपयांचा धनादेश दिला असता तो देखील वटला नाही. यामुळे बँकेने नेरुळ पोलिसांकडे जप्तीतली संपत्ती बळकावून भाड्याने दिल्याप्रकरणी तक्रार केली होती. त्याद्वारे पतसंस्थेचे अध्यक्ष संभाजी आढळराव, सचिव कलावती बावळेकर व खजिनदार सबिना ख्वाजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी