शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील भूमिपुत्रांना दिलासा देणारे पुनर्विकास धोरण तयार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 17:37 IST

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे सिडकोला निर्देश

मुंबई : नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी पुनर्विकासाचे सर्वसमावेशक धोरण तयार करा, असे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला दिले. भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नसून भूमिपुत्रांच्या डोक्यावर कायमस्वरुपी टांगती तलवार आहे. त्यांना हक्काचे व सुरक्षित घरकुल मिळवून देण्यासाठी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन पुनर्विकास धोरण तयार करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.

सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा शिंदे यांनी गुरुवारी घेतला. याप्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ही घरे नियमित करण्यात यावीत, अशी त्यांची मागणी आहे. यातली अनेक घरे जुनी आहेत. त्यामुळे त्यांचे समाधान होईल, अशा प्रकारे धोरण आखण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले.

अशा प्रकारचे धोरण आखण्यासाठी घरांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रथम लोकांचा विश्वास संपादन करा, गैरसमज दूर करा. सर्वेक्षण केल्याशिवाय निश्चित लाभ देणारी योजना तयार करता येणार नाही, हे त्यांना पटवून द्या. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि सूचनांचा विचार करून योजनेत आवश्यक ते बदल करण्याची लवचिकता ठेवा, असेही शिंदे यांनी सांगितले.

पाणीपुरवठा योजनांना गतीसिडकोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात येत असून परवडणाऱ्या घरांच्या देखील अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये नवी मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असून पाण्याची गरज देखील वाढणार आहे. हे लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले. सिडकोच्या पाणीपुरवठ्याच्या ज्या प्रस्तावित योजना आहेत, त्यांना गती देण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सर्व पावले उचलेल, अशी ग्वाही देखील शिंदे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcidcoसिडको