शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

आवरे पोर्ट गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 02:34 IST

रायगड जिल्ह्यातील ५ हजार ९७४ करोड रुपयांची गुंतवणूक असलेला बहुचर्चित रेवस-आवरे पोर्ट (रिलायन्स) हा खासगी प्रकल्प गुंडाळण्याची तयारी झाली आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातील ५ हजार ९७४ करोड रुपयांची गुंतवणूक असलेला बहुचर्चित रेवस-आवरे पोर्ट (रिलायन्स) हा खासगी प्रकल्प गुंडाळण्याची तयारी झाली आहे. ठरावीक मुदतीमध्ये प्रकल्प न उभारल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचे आदेश कोकण उपायुक्तांनी दिले आहेत, अशी माहिती खारेपाट विभाग शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे तालुक्यातील सुमारे बाराशे एकर जमीन रिलायन्सच्या तावडीतून पुन्हा शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पाच वर्षांत जमिनीवर प्रकल्प उभा राहिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी परत करण्याबाबत मागणी केली आहे. याबाबत कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत कार्यालयाला अवगत करावे, असे पत्र कोकण विभागाचे उपायुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी ३० मार्च २०१६ला जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. २०१२मध्ये हा प्रकल्प पूर्ण करायचा होता मात्र २०१६ उजाडले तरी, प्रकल्प सुरूही झाला नाही. त्यामुळे कायद्याचा आधार घेत आम्ही आमच्या जमिनी परत मिळाव्यात अशी मागणी केली होती, असे पाटील यांनी सांगितले. २००५-०६ या कालावधीत जिल्ह्यामध्ये सुमारे २६ सेझ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने एकट्या अलिबाग तालुक्यात सेझ प्रकल्पांची संख्या सर्वाधिक होती. याच कालावधीमध्ये अलिबाग तालुक्यातील रेवस-आवरे येथे रिलायन्सच्या खासगी पोर्टला परवानगी देण्यात आली होती. २००२मध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने याबाबतचे करारपत्र केले होेते. विजय पापाराव यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांना हा प्रकल्प विकला होता. पोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या अन्य जमिनीसाठी रिलायन्सने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यास २००६मध्येच सुरुवात केली होती. बहिरीचा पाडा, सोनकोठा, रामकोठा, माणकुळे, हाशिवरे, कावाडे, बेलपाडा, डावली, रांजणखार, मिळकतखार आणि नारंगी या गावातील सुमारे ३५० शेतकऱ्यांची सुमारे १२०० एकर जमीन खरेदीसाठी कंपनीने एकरी साडेपाच लाख रुपये मोजले होते.