शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी

By पंकज पाटील | Updated: June 5, 2023 19:25 IST

साधना मठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मठाचे नियंत्रक नरेश विठ्ठल रत्नाकर यांना पाच लाखाची भरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

बदलापूरबदलापूर जवळील इंदगाव येथे रत्नाकार महाराज यांच्या साधना मठावर सात वर्षापूर्वी हल्ला केल्याप्रकरणी बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक कॅप्टन आशीष दामले (३५) यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. हल्लेखोरांमधील १८ जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. बेकायदा जमाव जमविणे, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे, घुसखोरी, हल्ला करणे अशा गुन्ह्यांखाली कॅ. आशीष आनंद दामले यांना न्यायालयाने दोषी ठरविले. तसेच साधना मठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मठाचे नियंत्रक नरेश विठ्ठल रत्नाकर यांना पाच लाखाची भरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

न्यायालयाने दामले यांना दोषी ठरवले असले तरी त्यांना कोणतीही शिक्षा अद्याप सुनावलेली नाही. तर हरीश घाडगे, संतोष कदम, संकल्प लेले, वसंत लंघी, योगेश पाटील, उमेश लोखंडे, केतन शेळके, कौशल वर्मा, युवराज गीध, गणेश सोहनी, दीपक लोहिरे, पांडुरंग राठोड, राम लिहे, प्रज्वल तांबे, कुणाल राऊत, अमृत थोरात, धैर्यशील एजागज, हर्षल जाधव या हल्लेखोरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संगीता फड यांनी काम पाहिले. तर दामलेच्या वतीने ॲड. ए. वाय. पत्की यांनी काम पाहिले.

दरम्यान या प्रकरणी दामले यांना विचारले असता न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, दरोडा व अपहरण या सारख्या गंभीर आरोप करून माझे राजकीय नव्हे तर माझे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, तो न्यायालयाने हाणून पाडला, हे न्यायालयाने दिलेल्या निकालातून स्पष्ट होते, या आरोपातून आमची सर्वांची निर्दोष मुक्तता केलेली आहे, न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत वाचल्यानंतर आणि वकिलांशी चर्चा केल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ असे सांगितले. 

टॅग्स :badlapurबदलापूरCourtन्यायालय